फ्लेमिंगो पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी

नवी मुंबईतील खाडी किनारी फ्लोमिंगो पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी

नवी मुंबई : नवी मुंबईतील खाडी किनारी गेल्या काही दिवसापासून आलेल्या परदेशी फ्लेमिंगो पक्षी मुक्कामी आहेत.आणि पक्षांच्या थव्यांमुळे पाण्यावर गुलाबी चादर  तरंगताना दिसू लागली आहे. त्यामुळे खाडीमधील फ्लोमिंगो पाहण्यासाठी पक्षीप्रेमी ही गर्दी करू लागले आहेत. या फ्लेमिंगोचा मे महिन्यापर्यंत खाडी किनारी मुक्काम राहणार आहे.

नवी मुंबई शहराला विस्तीर्ण असा खाडी किनारा लाभला आहे.आणीन्या खाडी किनाऱ्यावर विविध प्रकारची जैव संपत्ती आहे.आणि  खाडीकिनाऱ्यावरील ही जैव संपत्ती आणि येथील वातावरण फ्लोमिंगो पक्षासाठी पोषक असल्याने थंडीत मोठ्या संख्येने फ्लेमिंगोंचे दर्शन होऊ लागले.त्यामुळे नवी मुंबई शहराच्या पश्चिमेला असलेल्या खाडीत फ्लेमिंगोची गुलाबी चादर पसरली असल्याने लहान-थोरांची पावले तिकडे वळू लागली आहेत.

जगात ६ जातीचे फ्लेमिंगो असले तरी नवी मुंबईच्या खाडीमध्ये सध्या लेसर आणि ग्रेटर असे दोन जातीचे फ्लेमिंगो पाहायला मिळत आहेत. लेसर जातीचे फ्लेमिंगो गुजरात मधील कच्छ येथून येतात तर ग्रेटर जातीचे फ्लेमिॅगो परदेशातील सायबेरिया आणि कझाकिस्तानमधून हजारो किलो मीटर प्रवास करून नवी मुंबईतील खाडीकिनारी स्थलांतरीत होत असतात.नवी मुंबईच्या खाडीकिनारी शेवाळ, लहान मासे, खेकडे, झिंगा आदी मुबलक खाद्य मिळत असल्याने फ्लेमिंगोची पसंती या भागात जास्त आहे. त्यामुळे वनविभागाने ठाणे, नवी मुंबई खाडी किनाऱ्याला फ्लेमिंगो पक्षी अभयारण्य घोषित केले आहे. शहरातील ऐरोली,नेरूळ चाणक्य आणि नेरूळ सीवुड या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फ्लेमिंगो आहेत.यातील नेरूळ सिवूड  दिल्ली पब्लिक स्कूल जवळील तलाव या रस्त्यालगतच असल्याने व सध्या शाळांना सुट्टी असल्याने येथील फ्लेमिंगो पाहण्यासाठी रोज हजारो नागरिक येत असतात.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘ऑक्सिपार्क'च्या निर्मितीने पनवेल शहराच्या सौंदर्यात आणखी भर