शहराच्या शाश्वत विकासासाठी ‘केडीएमसी'चे ७ कलमी मुद्दे -आयुक्त गोयल
नवी मुंबई शहरात विभागवार एक दिवस पाणी राहणार बंद
नवी मुंबई महानगर पालिकेच्या वतीने शहरात २८ एप्रिल पासून विभागवार आठवड्यातून एक दिवस संध्याकाळचा पाणी पुरवठा बंद
नवी मुंबई : यंदा पाऊस लांबणार असून सरासरी पेक्षा कमी पडणार आहे असा हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे राज्यशासनाने पाणी वापरा बाबत कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना सर्व महापालिकांना दिल्या आहेत.त्यानुसार नवी मुंबई महानगर पालिकेच्या वतीने शहरात २८ एप्रिल पासून विभागवार आठवड्यातून एक दिवस संध्याकाळचा पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
स्वतः च्या मालकीचे धरण असल्याने जल संपन्न महापालिका म्हणून नवी मुंबई शहराची आज ओळख आहे.नवी मुंबई शहराला मोरबे धरणातून पाणीपुरवठा होत असतो.सध्या या धरणात २० सप्टेंबर पर्यंत पुरेल इतका पाणीसाठा आहे. मात्र अल-निनो समुद्र प्रवाह सक्रियतेच्या प्रभावामुळे यावर्षी पाऊस लांबणार असल्याचा तसेच पावसाचे प्रमाण कमी राहणार असल्याच्या हवामान खात्याचा अंदाज आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार संभाव्य पाणी टंचाई निवारण्याकरीता विशेष कृती आराखडा तयार करणेबाबत महापालिकेस सुचना दिलेल्या आहेत.त्याअनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्राची पाणी पुरवठयाची गरज लक्षात घेता मोरबे धरणाच्या उपलब्ध पाणी साठ्यातून पाणी पुरवठयाचे नियोजन करणेसाठी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये विभागवार आठवडयातून एक दिवस संध्याकाळचा पाणी पुरवठा बंद करून पाणी कपात करण्याचे नियोजन आहे. त्यानुसार नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात दिनांक २८ एप्रिल पासून सात विभागात आठवड्यातून एक दिवस संध्यकाळी पाणी.बंद राहणार आहे.तसेच दिघा.विभागात एम आय सी.मार्फत पाणी पुरवठा होत असल्याने तेथील पाणी पुरवठा एम आय सी सी च्या शट डाऊन नुसार बंद राहणार असल्याची माहिती शहर अभियंता संजय देसाई यांनी दिली आहे.
विभागवार पाणी पुरवठा बंद
१)सोमवार--- बेलापुर
२) मंगळवार--कोपरखैरणे
३)बुधवार--- घणसोली
४)गुरुवार---वाशी
५)शुक्रवार-- ऐरोली
६)शनिवार--- नेरूळ
७) रविवार- तुर्भे
दिघा विभागामध्ये एमआयडीसी कडून पाणी घेऊन पाणी पुरवठा केला जातो. त्यामुळे एम आय डी सी च्या शटडाऊननुसार त्या ठिकाणचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
.