ऑलम्पिक साईज तरण तलाव, एनएमएमटीचा बस डेपो, पार्किंग, बँक्वेट हॉल, इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन, योगा  रूम, स्पोर्ट्स हॉल सुविधा

वाशी येथील बहुउद्देशीय सुविधा प्रकल्प नवी मुंबईसाठी मानाचा ठरेल

नवी मुंबई : वाशी, सेक्टर-12 येथील नवी मुंबई महापालिकेच्या वतीनेउभारण्यात येणाऱ्या बस स्थानक, वाणिज्य संकुल आणि आंतरक्रीडा  संकुल तसेच ऑलिंपिक आकाराच्या जलतरण तलाव प्रकल्पाचा आमदार गणेश नाईक यांनी पाहणी दौरा केला. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर नवी मुंबईसाठी तो मानाचा ठरेल तसेच  नवी मुंबईकरांना नवीन आधुनिक सुविधा प्राप्त होतील, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.

 माजी आमदार संदीप नाईक, माजी महापौर सागर नाईक, माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत,  संपत शेवाळे, शुभांगी पाटील, आदि लोकप्रतिनिधी पदाधिकारी तसेच,महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी अरविंद शिंदे यावेळी उपस्थित होते. या प्रकल्पाची इमारत तळ अधिक आठ मजल्यांची आहे.  191.96 कोटी रुपयांचाखर्च अपेक्षित आहे.

नवी मुंबई शहर देशात राहण्यायोग्य शहरांच्या यादीत वरच्या क्रमांकावर आहे. इतर शहरातील नागरिक नवी मुंबई शहरामध्ये घर घेऊन राहण्यास इच्छुक असतात. याचे प्रमुख कारण म्हणजे नवी मुंबईमध्ये उपलब्ध असणाऱ्या मूलभूत आणि पायाभूत नागरी सुविधा असल्याचे नाईक यांनी सांगितले.

वाशी सेक्टर 12 मधील या प्रकल्पामध्ये तळमजल्यावर बांधण्यात येत असलेल्या प्रशस्त बस स्थानकामध्ये आठ बस थांबे आहेत. त्यामुळे येथून होणारी एमएमटीच्या बसेसची वाहतूक सुरळीत होणार आहे.  नवी मुंबईच्या विविध भागात नागरिकांना प्रवास करता येणार आहे. परिवहनच्या ताफ्यातील इलेक्ट्रिक बसची वाढती संख्या पाहता या ठिकाणी बसेससाठी इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन देखील असणार आहे.


नवी मुंबई मधून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू तयार व्हावेत यासाठी क्रीडा सरावाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे धोरण आतापर्यंत लोकनेते नाईक यांनी राबवले आहे. या अंतर्गत त्यांनी केलेल्या सूचनेनुसार या प्रकल्पात तिसऱ्या मजल्यावर खेळण्याच्या सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत यामध्ये स्कॉश कोर्ट बांधण्यात येणार आहे. त्याचबरोबर योगा रूम देखील असणार आहे. एक स्पोर्ट हॉल बांधण्यात येणार आहे. नवी मुंबईमध्ये अनेक गुणवंत जलतरणपटू आहेत.  या प्रकल्पातील चौथ्या मजल्यावर एक ऑलम्पिक आकाराचा तरण तलाव बांधण्यात येणार आहे. या तलावाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर नवी मुंबईतील जलतरणपटू आणि पोहण्यास इच्छुक नागरिकांना एक चांगली सुविधा महापालिकेच्या माध्यमातून नवी मुंबईमध्येउपलब्ध होणार आहे.‌

प्रकल्पातील सुविधा
तळ मजल्यावर आठ बस थांब इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन वाहन तळ एनएमएमटी  कंट्रोल रूम
तर आणि पहिल्या मजल्यावर 11 शो रूम
दुसऱ्या मजल्यावर फिल्टरेशन प्लांट वाहन तळ
तिसऱ्या मजल्यावर खेळण्याच्या सुविधा स्क्वेश  कोर्ट योगा रूम स्पोर्ट्स हॉल वाहनतळ
चौथ्या मजल्यावर ओलंपिक आकाराचा स्विमिंग पूल ( २५ मिटर*५० मिटर)
कॅफेटेरिया ‌ वाहनतळ स्वच्छतागृह
पाचव्या मजल्यावर इंडोर गेम्स रूम योगा रूम मेडियारूम स्पोर्ट्स
स्वच्छतागृह 450 असं क्षमतेचे स्टेडियम
सहाव्या आणि सातव्या मजल्यावर कार्यालय
आठव्या मजल्यावर बँक्वेट हॉल

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

उद्योग मंत्री उदय सामंत यांची उद्योग-कामगार विभागाला सू्‌चना