७५,५०० किंमतीचे १४६ डझन आंबे अन्न औषध प्रशासनाने केले  जप्त

आंबा पिकवण्यासाठी रसायनाचा स्प्रे करणाऱ्या तीन व्यापाऱ्यांवर कारवाई

नवी मुंबई -: झटपट आंबा पिकवण्यासाठी काही व्यापारी आंब्यावर थेट रसायनाचा मारा करतात.मात्र अशा अवैध पद्धतीने कृत्रिमरीत्या आंबे पिकविणाऱ्या तीन व्यापाऱ्यांवर अन्न व औषध प्रशासनाने  धडक कारवाई केली असून त्यांच्या कडून ७५,५०० किंमतीचे १४६ डझन आंबे अन्न औषध प्रशासनाने केले  जप्त.

अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण, नवी दिल्ली यांनी कॅल्शियम कार्बोईडचा वापर करून फळे पिकविणाऱ्यांवर बंदी घातलेली आहे. कॅल्शियम कार्बोईडया रसायनामधुन ऍसिटिलीन हा वायू उत्सर्जित होतो व त्यामुळे फळे पिकतात परंतु त्याचा मानवी आरोग्यावर घातक परिणाम होतो. त्यामुळे या रसायनाच्या वापरावर बंदी आहे. परंतु इथिलिन वायूचा विहित पद्धतीने वापर करून फळे पिकविण्यासाठी मान्यता आहे. त्यासाठी अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाने मार्गदर्शक तत्वे जारी केलेली आहेत. त्यानुसार इथिलिन गॅस सिलिंडर, कॉम्प्रेस्ड इथिलिन गॅस, इथिलिन गॅस उत्सर्जित करणारी रसायने व इथेफॉम सॅचेट हे विहित पद्धतीने वापरण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. इथिलिन गॅस उत्सर्जित करणाऱ्या रसायनांना जरी मान्यता दिली असली तरी त्या रसायनांच्या द्रावणाचा थेट फळांशी संपर्क येणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक आहे .मात्र असे नियम असताना देखील वाशीतील एपीएमसी फळ बाजारात इथेफॉम पाण्यात मिसळून त्याचा थेट मारा आंब्यावर करत होते. अशा तक्रारी अन्न औषध प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. तसेच अशा प्रकारे     रसायनाचा थेट मारा करत असल्याच्या  काही चित्रफिती समाज माध्यमांवर प्रसारीत झाल्या होत्या.आणि याची दखल घेत अन्न व औषध प्रशासन पथकाने सोमवारी टाकलेल्या धाडीत तीन व्यापाऱ्यांवर धडक कारवाई करण्यात आली.या कारवाईत इथलेन / इथेफॉन या इथिलिन गॅस उत्सर्जित करणाऱ्या रसायनांचे द्रावण थेट आंबा या फळावर स्प्रे केल्याच्या संशयावरून सदर फळांचे नमुने घेऊन उर्वरित १४६ डझन किंमत रु. ७५,५०० चा साठा अन्न औषध प्रशासनाकडून जप्त केला असून नमुने तपासणी साठी दीले आहेत.. अशी माहिती सहाय्यक आयुक्त योगेश ढाणे यांनी दिली.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

ऑलम्पिक साईज तरण तलाव, एनएमएमटीचा बस डेपो, पार्किंग, बँक्वेट हॉल, इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन, योगा  रूम, स्पोर्ट्स हॉल सुविधा