युलू ई-बाईक्सना तरुणांची पसंती  

युलू ई-बाइक्स मुळे 2.2 दशलक्ष टन कार्बन उत्सर्जन आणि प्रदूषण पातळी कमी करण्यास मदत

नवी मुंबई : बदलत्या काळानुसार लोकांच्या वाहतुकीच्या पद्धतीतही बदल दिसून येत आहे. या बदलात युलू ई-बाईक हे नवीन वाहन दाखल झाले आहे. सध्या युलू-ई बाईक्स नवी मुंबई व मुंबईत मोठ्या प्रमाणात कार्यरत आहेत. मागील एक वर्षापासून सुरु असलेल्या या युलू ई-बाईक्स सेवेमुळे नवी मुंबई, मुंबईतील वातावरणात तब्बल 2.2 दशलक्ष टन कार्बन उत्सर्जन आणि प्रदूषण पातळी कमी करण्यास मदत झाल्याचा दावा युलू ऑपरेटर कडुन करण्यात आला आहे.  

तरुणांकडून युलू ई बाईक्सना चांगलीच पसंती मिळत असून युलूच्या मासिक वापरकर्त्यांमध्ये 5 टक्के वाढ झाली आहे. याच अनुषंगाने या वर्ष अखेरीस युलूच्या वापरकर्त्यांमध्ये 4 पट अधिक वाढिची अपेक्षा आहे. त्यामुळे युलूने 2023 अखेरपर्यंत मुंबई आणि नवी मुंबईत युलूच्या विस्ताराची योजना आखली आहे. नवी मुंबई आणि मुंबईतील रस्त्यावरील सध्या 3500 हून अधिक युलू ई बाईक्स सक्रिय असून या वर्ष अखेरीपर्यंत 10 हजार पेक्षा जास्त युलू ई बाईक्स रस्त्यावर उतरविण्याचे युलूचे उद्दिष्ट आहे.  


मुंबई आणि नवी मुंबईतील नागरिक युलूवर दररोज तब्बल 150 किलो मीटरहून अधिक प्रवास करत आहेत. तसेच दररोज 3 हजारांहून अधिक लोक वैयक्तिक प्रवास करत आहेत. त्याचप्रमाणे डिलिव्हरीसाठी असलेल्या युलू ई-बाईक्स फूड डिलिव्हरी ऍफ्स, पार्सल आणि कुरिअर ऍफ्स आदींकडून देखील युलूचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येत असुन युलू डेक्सद्वारे दररोज 30 हजाराहून अधिक डिलिव्हरी केल्या जात आहेत. गेल्या वर्षी सफ्टेंबरपर्यंत, 450 युलू बाइक्सनी 2 लाख ट्रिप पूर्ण करुन जवळपास 10 लाख किलोमीटरचे अंतर कापले आहे. 22 दशलक्ष किमी पेक्षा जास्त किमी अंतराचा टप्पा गाठलेल्या युलू ई बाईक्समुळे 2.2 दशलक्ष टन उत्सर्जन आणि प्रदूषण पातळी कमी करण्यास मदत केली आहे. - आर.के. मिश्रा (सह संस्थापक युलू)

 
युलू ही शहराच्या गतीशीलतेला चालना देणारी, परवडणारी आणि सर्वांसाठी सोयीचे वाहन आहे. युलू ई बाईक्स दैनंदिन प्रवाशांसाठी सोयीस्कर, स्मार्ट आणि परवडणाऱया असून डिलिव्हरी करणाऱयांसाठी या खुप फायद्याच्या ठरत आहेत. युलू ई बाईक्स सध्या मुंबईत अंधेरी, बीकेसी, वांद्रे पश्चिम तर नवी मुंबईत वाशी, कोपरखैरणे, नेरुळ आणि सीबीडी येथून तब्बल 200 चौरस किमीच्या क्षेत्रामध्ये ही सेवा चालविली जात आहे. येत्या काही दिवसांमध्ये मध्य आणि दक्षिण मुंबईमध्ये या सेवेचा विस्तार करण्यात येणार आहे. पुढील तिमाहीत आणखी 200 प्रमुख ठिकाणी युलू झोन स्थापन करण्याची कंपनीची योजना आहे.    

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

माझी वसुंधरा अभियान...