शहराच्या शाश्वत विकासासाठी ‘केडीएमसी'चे ७ कलमी मुद्दे -आयुक्त गोयल
ॲड. सचिन शिंदे यांच्या वाढदिवशी ‘नवी मुंबई स्टुडन्टस् ॲन्ड युथ फाऊंडेशन'चा उपक्रम
जुईनगर येथे मोफत आरोग्य तपासणी, रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ
नवी मुंबई ः ‘नवी मुंबई स्टुडन्टस् ॲन्ड युथ फाऊंडेशन'चे प्रमुख सल्लागार समाजसेवक ॲड. सचिन जगन्नाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन तसेच मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ करण्यात आला. ‘नवी मुंबई स्टुडन्टस् ॲन्ड युथ फाऊंडेशन'चे अध्यक्ष मनोज महाराणा आणि मित्र परिवार तर्फे सदर आरोग्य तपासणी शिबीर जुईनगर, सेवटर-२५ मधील श्री स्वामी समर्थ मठ येथे संपन्न झाले.
यावेळी युवा नेता निशांत भगत आणि संदीप भगत यांच्या हस्ते श्री गणेश आणि श्री स्वामी समर्थ यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण केल्यानंतर कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. मोफत रुग्णवाहिका सेवेचे उद्घाटन महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत यांच्या हस्ते करण्यात आले. आरोग्य तपासणी शिबिराचा सुमारे १५० ते २०० नागरिकांनी लाभ घेतला. यामध्ये नागरिकांची शुगर, बॉडी मास इंडेवस, ब्लड प्रेशर, बोन डेन्सिटी, नेत्र तपासणी करण्यात येऊन काहींना तज्ञ डॉवटरांनी मार्गदर्शनही केले. शिबिरावेळी शाईन कॉम्प्युटर इन्स्टिट्युटच्या वतीने विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षणासाठी ५ हजार रुपयांची स्कॉरलशीप देखील उपलब्ध करुन देण्यात आली.
माजी नगरसेवक गिरीश म्हात्रे, उद्योजक जग्गी पाटील, जनसेवक गणेश भगत, ‘महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस'चे उपाध्यक्ष इरफान पटेल, संतोष पाटील, टायगर ग्रुपचे महेंद्र डोंगरे, ‘मनसे'चे शहर सह-सचिव अभिजीत देसाई, ‘स्वराज संघटना'चे अध्यक्ष उमेश जुनघरे, विशाल वाघमोडे, आदिंनी यावेळी शिबिरास भेट दिली.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता ‘श्री. स्वामी समर्थ सेवा ट्रस्ट'चे अध्यक्ष संतोष सुतार, ‘जयश्री फाऊंडेशन'चे अध्यक्ष वैभव जाधव, स्वप्नील म्हात्रे, ओंकार जाधव, ‘रॉयल फाऊंडेशन'चे सागर गवारे, तानाजी, प्रशांत, शशांक शेवते तसेच ‘नवी मुंबई स्टुडन्टस् ॲन्ड युथ फाऊंडेशन'चे पदाधिकारी अक्षय डिगे, सुयश मुढे, विनायक एरंडे, गणेश सणस, वेदांत कोळंबे, सोनाली, आदिंनी विशेष सहकार्य केले.