शहराच्या शाश्वत विकासासाठी ‘केडीएमसी'चे ७ कलमी मुद्दे -आयुक्त गोयल
हेल्पलाईनची माहिती-जनजागृतीसाठी सामाजिक न्याय - विशेष सहाय्य विभागाचे आदेश
ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय हेल्पलाईन १४५६७ सुरु
नवी मुंबई ः देशभरातील ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या आणि तक्रारींच्या निवारणासाठी केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय-सबळीकरण मंत्रालय मार्फत १४५६७ क्रमांकाची राष्ट्रीय हेल्पलाईन, एल्डरलाईन सेवा सर्व राज्यात सुरु करण्यात आली आहे. या टोल फ्री हेल्पलाईनच्या माध्यमातून निवृत्तीवेतन, ज्येष्ठ नागरिक योजना, कायदेशीर समस्या, बेघर आणि वृध्दांवरील अत्याचार आदिंची माहिती आणि मदत देण्यात येत आहे. राष्ट्रीय समाज रक्षा संस्थान, केंद्रीय सामाजिक न्याय-सबलीकरण मंत्रालय, राज्याचा सामाजिक न्याय-विशेष सहाय्य विभाग आणि जनसेवा फाऊंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्याची ज्येष्ठांसाठीची राष्ट्रीय हेल्पलाईन जनसेवा फाऊंडेशन, पुणे यांच्याद्वारे चालविण्यात येत आहे. सदर हेल्पलाईन टोल फ्री स्वरुपात असून ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी आणि ज्येष्ठ व्यक्तीचे जीवनमान सुधारण्यासाठी माहिती, मार्गदर्शन आणि भावनिक आधार प्रदान करीत आहे. तसेच बेघर वृध्द व्यक्तीस मदत म्हणून वृध्दाश्रमांमध्ये निवारा देण्यात येत असून त्यांना पुन्हा त्यांच्या कुटुंबियांशी जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. याबाबतच्या प्रतिसाद प्रणालीने (रिस्पॉन्स सिस्टम) राज्यात संबंधित क्षेत्रात काम सुरु केले आहे.
या हेल्पलाईनच्या सेवा देशभरात वाढविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. राज्यातील सर्व वयोवृध्दांना सदर सेवा उपलब्ध करण्यासाठी ‘जनसेवा फाऊंडेशन'च्या जिल्हा पातळीवर क्षेत्रीय प्रतिनिधींनी सर्व जिल्ह्यात काम सुरु केले आहे. जिल्ह्यांमध्ये एल्डर लाईन क्रमांक १४५६७ च्या सेवा वाढविण्यासंदर्भात सदर राष्ट्रीय हेल्पलाईनच्या कार्यकारिणी सदस्यांना प्रशासनाने सहकार्य करुन हेल्पलाईनची माहिती आणि जनजागृती करण्याबाबत राज्याच्या सामाजिक न्याय-विशेष सहाय्य विभागाने परिपत्रक जारी केले आहे.