स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण द्वारे वसुंधरा दिन साजरा

वसुंधरा दिनी पर्यावरण रक्षण-संवर्धनाचा स्वकृतीतून संदेश 

नवी मुंबई : जगभरात वसुंधरा दिन साजरा केला जात असून महाराष्ट्र शासनाच्या ‘माझी वसुंधरा अभियान'मध्ये राज्यातील सर्वप्रथम क्रमांकाचे पर्यावरणशील शहर म्हणून मानांकन लाभलेल्या नवी मुंबई शहरामध्येही लोकसहभागातून नवी मुंबई महापालिकेने विविध उपक्रमांचे आयोजन केले होते. त्याअनुषंगाने नवी मुंबई महापालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देत लेटस्‌ सेलिब्रेट फिटनेस आणि रबाले येथील क्रोडा केमिकल कंपनी यांच्या सहयोगाने आयोजित विशेष उपक्रमात सहभागी होण्यासाठी नागरिक जागतिक वसुंधरा दिनी वाशी येथील मिनी सी-शोअर परिसरात एकत्र जमले. या पर्यावरणप्रेमी नागरिकांनी परिसरात स्वच्छतेची मोहीम राबवून संपूर्ण परिसर स्वच्छ केला. मानवाच्या दृष्टीने पृथ्वीचे नैसर्गिक पातळीवर जतन करणे काळाची गरज आहे. सदर बाब लक्षात घ्ोऊन जागतिक वसुंधरा दिनी पर्यावरण रक्षण-संवर्धनाचा स्वकृतीतून संदेश प्रसारित करण्याच्या दृष्टीने मिनी सी-शोअर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

सदर उपक्रमाप्रसंगी महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, स्वच्छता अधिकारी सुधीर पोटफोडे, उद्यान अधिकारी भालचंद्र गवळी, क्रोडा कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक मुरली दिऊर, ‘लेटस्‌ सेलिब्रेट फिटनेस'च्या अध्यक्ष रिचा समीत तसेच स्वच्छता निरीक्षक, पर्यवेक्षक, सफाईमित्र आणि संस्था, उद्योगसमुहाचे कर्मचारी आणि स्वच्छताप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. याप्रसंगी सर्वांनी सामुहिक शपथ ग्रहण करीत वसुंधरा रक्षण-संवर्धनाची जबाबदारी व्यवतीगत आणि सामाजिक स्तरावर घेण्याचा निश्चय केला. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

आंबा पिकवण्यासाठी इथेफॉन रासायनिक द्रव्याचा फवारणी स्वरुपात वापर ; धक्कादायक बाब समोर