मुस्लिमांचा पवित्र सण रमजान ईद देश-विदेशात मोठ्या उत्साहात साजरा

रमजान ईद उत्साहात साजरी

नवी मुंबई ः मुस्लिम बांधवाचा आनंदाचा सनजला जाणारा पवित्र सण रमजान ईद देश-विदेशात मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. रमजान ईद निमित्त वाशी, सेवटर-९ येथील नूर मस्जिद येथे ‘बेलापूर'च्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे आणि ‘नवी मुंबई'चे पोलीस आयुवत मिलिंद भारंबे यांच्या प्रमुख उपस्थित मुस्लीम बांधवांनी सण साजरा केला.

यावेळी आ. सौ. मंदाताई म्हात्रे आणि पोलीस आयुवत मिलिंद भारंबे यांनी मुस्लीम बांधवांना गुलाब देऊन रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. पवित्र रमजान महिन्यातील रोजे संपवून २२ एप्रिल रोजी सकाळी ठिकठिकाणी नमाज अदा
करण्यात आली. नवी मुंबईत मोठ्या उत्साहात मुस्लिम बांधव ईद साजरी करण्यात आली. वाशी येथील नूर मस्जिद येथे सकाळ पासूनच नमाज अदा करण्यासाठी नवी मुंबईकर मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी गळा भेट करुन उपस्थित बांधवांनी एकमेकांना ‘ईद'च्या शुभेच्छा देखील दिल्या. याप्रसंगी पोलीस उपायुक्त विवेक पानसरे, ‘शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)'चे जिल्हाप्रमुख वि्ील मोरे, अब्दुल हमीद खान (पाशा भाई), अश्रफ
नियाजी, आदिंनी मुस्लिम बांधवांना गुलाबाचे फुल देऊन ‘ईद'च्या शुभेच्छा दिल्या. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण द्वारे वसुंधरा दिन साजरा