भारती विद्यापीठ आयोजित माजी विद्यार्थी मेळावा २०२३ संपन्न

भारती विद्यापीठ आयोजित माजी विद्यार्थी मेळावा २०२३

भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च माजी विद्यार्थी संघटनेने भारती विद्यापीठ परिसर बेलापूर येथे माजी विद्यार्थी मेळावा यादे २०२३ उत्साहाने आयोजित केला.या कार्यक्रमास विविध वर्षाच्या आणि शाखेच्या 800 हून अधिक माजी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.

यादे २०२३ चे उद्घाटन अरुप गुप्ता, अध्यक्ष-माजी विद्यार्थी संघटना, बी व्ही आय एम एस आर, डॉ. विलासराव कदम, प्रादेशिक संचालक, भारती विद्यापीठ मुंबई परिसर, विजय चव्हाण, सचिव,माजी विद्यार्थी संघटना, डॉ. अंजली कळसे, संचालिका,  बी व्ही आय एम एस आर यांच्या उपस्थित पार पडला.डॉ. कळसे ह्यांनी माजी विद्यार्थ्याच्या कॉर्पोरेट जगातील विकासाबद्दल समाधान व्यक्त केले तसेच माजी विद्यार्थ्यांना संस्थेशी विविध स्वरूपाने जुळण्याचे आवाहन केले. माजी विद्यार्थ्यांनी प्रोजेक्ट मार्गदर्शन, प्लेसमेंट आणि इतर योग्य मार्गाने विद्यार्थ्यांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

शुभम कुमार आणि वेदिका मोहिते यांना वर्ष २०२२-२३ चे उत्कृष्ठ विद्यार्थी म्हणून गौरवण्यात आले तसेच डॉ. प्रियेता प्रियदर्शनी यांना त्यांच्या प्लेसमेंटमधील योगदानासाठी गौरवण्यात आले.

माजी विद्यार्थी संघटना तर्फे उपस्थित सर्व माजी विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि आयोजनात कार्य केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे यादे २०२३ यशस्वी केल्याबद्दल आभार व्यक्त केले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

लघु उद्योजकांनी महापालिकेकडे थकीत मालमत्ता कर भरावा -सर्वोच्च न्यायालय