फळांचा रस सुरक्षित आहे का?

तुम्ही पित असलेला रस सुरक्षित आहे का?

वाशी ः वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) फळ बाजारात रोज शेकडो फळांच्या गाड्या दाखल होत असतात. या गाड्यांतील खराब फळे त्याच ठिकाणी फेकली जातात. मात्र, फेकलेली खराब फळे काहीजण रस बनवण्यासाठी जमा करीत असल्याचा धक्कादायक प्रकार एपीएमसी मध्ये समोर आला आहे. त्यामुळे तुम्ही पित असलेला रस सुरक्षित आहे का?, असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

उन्हाळ्यात उकाड्यापासून थंडावा मिळावा म्हणून बहुतांश नागरिक शीतपेयांकडे वळतात. यात फळांच्या रसाचा देखील समावेश आहे. वाशी मधील एपीएमसी फळ बाजार देशातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे या ठिकाणी रोज शेकडो फळांच्या गाड्या दाखल होत असतात. येथूनच उपनगरात फळे वितरीत होतात. मात्र, यातील काही फळे खराब झाल्यानंतर ती तिथेच फेकली जातात. याच फळांवर काही जण नजर ठेवून असतात. फेकलेली फळे गोळा करुन रस बनवण्यासाठी नेली जातात. त्यामुळे फळे किती चांगली आणि त्यापासून निघणारा रस किती दर्जेदार?, असा प्रश्न सध्या नवी मुंबईकरांना पडला आहे. कारण एक व्यक्ती फेकलेले सफरचंद चक्क रस बनवण्यासाठी गोळा करीत असल्याचे चित्रित झाले आहे. फेकलेली फळे घरी रस बनवण्यासाठी गोळा करीत असल्याचे त्याने स्वतः कबुली दिली आहे. वाशी मधील एपीएमसी फळ बाजारात सदर धक्कादायक प्रकार घडला आहे. मात्र, फेकलेली फळे नक्की घरी नेण्यासाठी जमा करीत आहे की बाहेर विक्री साठी?, यावर संशय निर्माण होत आहे. त्यामुळे अशा फळांपासून तयार केलेला रस किती सुरक्षित आहे?, असा सवाल उपस्थित होत आहे. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

भारती विद्यापीठ आयोजित माजी विद्यार्थी मेळावा २०२३ संपन्न