वाढत्या प्रदूषण विरोधात ‘प्रदूषण नियंत्रण मंडळ' ‘ॲक्शन मोड'वर

‘प्रदूषण नियंत्रण मंडळ' ‘ॲक्शन मोड'वर

वाशी ः नवी मुंबई शहरात औद्योगिक वसाहतीमधील रासायनिक कारखान्यांमधून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. याची दखल आता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने घेतली असून, यावर तात्काळ उपाययोजना करण्यासाठी नवी मुंबई महापालिका आणि एमआयडीसी प्रशासनाला सूचना देण्यात आल्या आहेत.
नवी मुंबई शहरात पूर्व दिशेला मोठी औद्योगिक वसाहत आहे. येथील रासायनिक कारखान्यांमधून रासायनिक द्रव्य तसेच वायू सोडण्यात येत असल्याने वाशी, कोपरी, खैरणे, घणसोली आदी भागात रोजच वायू प्रदूषण होऊन दर्प वास येत असतो. याविरोधात स्थानिकांनी वारंवार प्रदूषण मंडळाकडे तक्रारी केल्या आहेत. त्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिका आणि एमआयडीसी अधिकाऱ्यांसमवेत औद्योविक वसाहतीत संयुक्त पाहणी दौरा केला. त्यात कारखान्यांसोबतच येथील नागरी वस्त्यांमधून देखील सांडपाण्याद्वारे प्रदूषण होत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे यावर तात्काळ लघुकालिन, मध्यावधी आणि दीर्घकालीन उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.


वर्षभरात ८२ कारखान्यांवर कारवाई
नवी मुंबई शहरात दिवसेंदिवस वायू तसेच जल प्रदूषण वाढत आहे. याचा मानवी आरोग्यावर होणारा दुष्परिणाम पाहता प्रदूषण करणाऱ्या उद्योगांविरोधात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ ॲक्शन मोडवर आले असून, मागील वर्षभरात ८२ उद्योगांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यात ३५ जणांना कारणे दाखवा नोटीस, २३ जणांना प्रस्तावित निर्देश, १६ जणांना अंतरिम निर्देश आणि ८ जणांना बंदचे आदेश देण्यात आले आहेत. - जयंत कदम, उपप्रादेशिक अधिकारी - महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, नवी मुंबई.


लघुकालीन उपाययोजना
- नवी मुंबई परिसरातील अनेक नाल्यातील खाडीस मिळणारे सांडपाणी वळवून जवळच्या परिसरातील महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील मलनिस्सारण वाहिनीला जोडून सांडपाणी प्रक्रिया यंत्रणेमध्ये पुढील प्रक्रियेसाठी निस्सारण करणे.
- घणसोली आणि शेजारील परिसरातील नाला रबाळे परिसरातील सी. ई. टी. पी. चेंबर्सच्या वहननलिकेला जोडणी करणे.


मध्यावधी उपाययोजना
- टी. टी. सी. औद्योगिक वसाहती जवळील नवी मुंबई परिसरातील रहिवासी भागातून निर्माण होणारे घरगुती सांडपाणी विनाप्रक्रिया नाल्यात मिसळणे यासंबंधी नवी मुंबई महापालिकेने पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या नामांकित संस्थांकडून (ऱ्िंिंRघ्/घ्घ्ऊ ाूम्.) मध्यावधी उपाययोजना जसे झ्प्ब्ूद Rास्‌ग्ीूग्दह अथवा इतर उपाययोजनाबाबत विस्तृत अहवाल तयार करुन अंमलबजावणी करणे.


र्दिघकालिन उपाययोजना
- टी. टी. सी. औद्योगिक वसाहती शेजारील रहिवासी भागातून निर्माण होणाऱ्या घरगुती सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याकरिता ५ द. ल. घ. मी. क्षमतेची सांडपाणी प्रक्रिया यंत्रणा उभारणीबाबत तात्काळ कार्यवाही करणे. सदर सांडपाणी प्रक्रिया यंत्रणा उभारणी करिता औद्योगिक वसाहतीमध्ये नवी मुंबई महापालिकेस जागा उपलब्ध करुन देणेबाबत तात्काळ कार्यवाही करणे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

फळांचा रस सुरक्षित आहे का?