‘एनएमएमटी'चे चालक नंदकुमार लावंड यांचा राष्ट्रीय गौरव

 

नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमातील चालक नंदकुमार लावंड  यांचा हिरोज ऑन द रोड पुरस्काराने सन्मान

नवी मुंबई ः नवी दिल्ली येथे पार पडलेल्या रस्ते सुरक्षा पुरस्कार वितरण सोहळ्यात नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमातील चालक नंदकुमार लावंड यांना हिरोज ऑन द रोड पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामुळे महापालिका परिवहन उपक्रमाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. कॉन्स्टिट्युशन क्लब ऑफ इंडिया, नवी दिल्ली येथे आर.टी. अँड एच (Rर्ऊप्) आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री यांच्या हस्ते देशातील राज्य रस्ते परिवहन महामंडळाच्या शहरांतर्गत बस सेवेतील २७ चालकांना राष्ट्रीय
स्तरावरील हिरोज ऑन द रोड या रस्ते सुरक्षा पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यामध्ये ‘एनएमएमटी'मधील चालक नंदकुमार लावंड (चा.क्र.०९६१३२) यांना त्यांच्या अविरत २७ वर्षामधील विना अपघात सेवेसाठी पुरस्कृत करण्यात आले. त्यामुळे एनएमएमटी मधील अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून लावंड यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नवी मुंबई मेट्रोची रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून तपासणी