माहिती कार्यालयातील कै.संजय कोळी यांच्या कुटुबियांना २० हजार प्रदान

मंत्रालय को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी तर्फे दिवंगत शासकीय कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला मदत

नवी मुंबई ः मंत्रालय को-ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटीच्या कोकणभवन शाखेच्यावतीने दिवंगत शासकीय कर्मचारी कै. संजय कोळी यांच्या कुटुंबियांना २० हजार रुपयांची मदत करण्यात आली.

विभागीय माहिती कार्यालयातील कर्मचारी कै. संजय नवल कोळी यांचे २८ मार्च २०२३ रोजी अल्पशः आजाराने निधन झाले होते. कोळी कोकण भवन मधील माहिती-जनसंपर्क विभागात कार्यरत होते. तसेच ते मंत्रालय को-ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटीच्या कोकण भवन शाखेचे सदस्य होते. १७ एप्रिल रोजी मृत कोळी यांच्या पत्नी इंदुमती कोळी आणि त्यांचा मुलगा तुषार कोळी यांना कोकण विभागीय माहिती उपसंचालक डॉ. गणेश मुळे यांच्या उपस्थितीत मंत्रालय को-ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटीचे पालक संचालक अजित न्यायनिरगुणे आणि खजिनदार सुधीर केळवणकर यांच्या हस्ते २० हजार रुपये रोख देण्यात आले. मंत्रालय को-ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटीच्या ऑगस्ट २०२२ मध्ये झालेल्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत एकता पॅनल निवडून आले होते. ‘एकता पॅनल'चे उपाध्यक्ष भाऊसाहेब पठाण, सहाय्यक व्यवस्थापक अनिल भगते, चेअरमन रमेश दौलत लवांडे आणि सचिव शशिकांत साखरकर यांच्या संकल्पनेतून क्रेडीट सोसायटीच्या सदस्यांचा आकस्मिक मृत्यू झाल्यास त्यांना २० हजार रुपये देण्याची योजना सन-२०२३ पासून राबविण्यास सुरुवात झाली आहे. नवनियुक्त पॅनलचा सदर निर्णय कौतुकास्पद आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 ‘एनएमएमटी'चे चालक नंदकुमार लावंड यांचा राष्ट्रीय गौरव