वाढत्या तापमानामुळे आवश्यक काळजी घेण्याचे महापालिका आयुवतांचे नागरिकांना आवाहन

उष्माघाताच्या रुग्णांसाठी मिनाताई ठाकरे रुग्णालय येथे विशेष कक्ष स्थापन

नवी मुंबई ः सद्यस्थितीत वातावरणातील तापमानात मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याने उष्माघाताचे प्रमाण वाढले आहे. उष्णतेच्या लाटेमुळे प्रकृतीवर होणारे गंभीर परिणाम टाळण्यासाठी नागरिकांनी उन्हात कामाशिवाय घराबाहेर पडू नये. स्वतःची आणि कुटुंबियांची काळजी घ्यावी, असे आवाहन महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी केले आहे. उन्हात काम करणाऱ्या व्यक्तींनी डोक्यावर टोपी अथवा छत्रीचा वापर करावा. तसेच ओल्या कपड्यांनी डोके, मान आणि चेहरा झाकावा. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्याचे जाणवल्यास ओआरएस, घरी बनविलेली लस्सी, तोरणी, लिंबू पाणी, ताक अशी पेये नियमित घ्यावीत. दिल्लीमध्ये उन्हाळा उशीरा सुरु होत असल्याने सीबीएसई बोर्डाला जून मध्ये उन्हाळी सुट्ट्या दिल्या जातात. पण, सध्याची परिस्थिती लक्षात घेता त्या मे महिन्यात दिल्या जाव्यात. तसेच शालेय वाहतुकी दरम्यान हायड्रेशन राखण्यासाठी पिटीच्या तासातील मैदानी खेळ सकाळी ९.३० च्या आधी संपवावेत, असे सूचित करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे आऊटडोअर ॲक्टिव्हिटी सायंकाळी ५ नंतर ठेवाव्यात, जेणेकरुन सुर्यप्रकाशाची तीव्रता कमी जाणवेल. तसेच दर तासाला पाणी पिणे, शाळांमध्ये टोपी घालणे अनिवार्य करावे आणि फळांचे सेवन वाढवावे, असेही सूचित करण्यात येत आहे.

उन्हाचा त्रास होऊ लागल्यास तात्काळ नजिकच्या महापालिका आरोग्य केंद्राशी अथवा रुग्णालयाशी संपर्क साधावा. याठिकाणी उष्णलहरी बाधित रुग्णांवर आवश्यक उपचार तातडीने करण्याची आणि त्यासाठीचा आवश्यक औषध साठा करुन ठेवण्याचे निर्देश आरोग्य विभागाला देण्यात आल्याचे आयुवत राजेश नार्वेकर यांनी सांगितले. दरम्यान, महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या निर्देशानुसार उष्माघाताच्या रुग्णांवर तात्काळ उपचार करण्यासाठी माँसाहेब मिनाताई ठाकरे रुग्णालय, नेरुळ येथे विशेष उपचार कक्ष सुरु करण्यात आलेला आहे. 

बाहेरचे तापमान प्रमाणाबाहेर वाढल्यानंतर शरीरातील तापमान नियंत्रित करण्याची यंत्रणा कोलमडते. उष्माघात झाल्यावर चक्कर येणे, मळमळ, उलट्या होणे, डोकेदुखी, दरदरुन घाम फुटणे, थकवा येणे, स्नायुंना आकडी येणे अशी लक्षणे दिसू लागताच जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क करावा. उष्माघात होऊ नये म्हणून तहान लागलेली नसली तरीसुध्दा जास्तीत जास्त पाणी पिण्यात प्यावे. हलके, पातळ आणि सच्छिद्र सुती कपडे वापरावेत, बाहेर जातांना गॉगल्स, छत्री, टोपी, बुट आणि चप्पलचा वापर करण्यात यावा. प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत ठेवावी. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

माहिती कार्यालयातील कै.संजय कोळी यांच्या कुटुबियांना २० हजार प्रदान