घरांची किंमत ३५ लाखापर्यंत महाग केल्याबाबत मांडले राज ठाकरेकडे गाऱ्हाणे

सिडको सोडतधारकांचे राज ठाकरे यांना साकडे

नवी मुंबई ः शेकडो सिडको सोडतधारकांनी ‘मनसे'चे अध्यक्ष राज ठाकरे यांची १७ एप्रिल कळंबोली येथे भेट घेतली. यावेळी या सोडधारकांनी आपल्या समस्यांच गाऱ्हाणे राज ठाकरे यांच्या समोर मांडताना त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी साकडे घातले आहे. सिडको सोडतधारकांनी राज ठाकरे यांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील घरांचे दर ‘सिडको'ने अवाजवी कसे वाढवले ते पटवून दिले. दरम्यान ‘सिडको'ने जाहिरात काढताना ३१० चौरस फूटक्षेत्रफळाचे घर देणार असे म्हटले होते. पण, प्रत्यक्षात सिडको २९० चौरस फुटांचे घर देत असल्याची बाब या सोडतधारकांनी राज ठाकरे यांच्या कानी घातली. यानंतर राज ठाकरे यांनी लवकरच मुख्यमंत्र्यांशी बोलून सदरचा विषय धसास लावतो, असे आश्वासन सोडतधारकांना दिले. पंतप्रधान आवास योजना मधील  ७८४९ घरांची लॉटरी काढताना ‘सिडको'ने अत्यल्प उत्पन्न गटातील सोडत धारकांना उलवे नोड येथे ३५ लाखांच्या किमतीत घरांचे दर ठेवल्याने सदरचे दर कमी करावेत, म्हणून सिडको सोडतधारक महिनाभरापासून लढा देत आहेत. यासंदर्भात ६ एप्रिल रोजी या सोडतधारकांनी ‘मनसे'च्या पदाधिकाऱ्यांसमवेत ‘सिडको'चे सह-व्यवस्थापकीय संचालक राजेश पाटील यांची भेट घेतली. ८ एप्रिल रोजी टि्‌वटर वर क्ष्ण्ग्‌म्दध्नीझ्ीग्म्‌प्दसे या ‘हॅशटॅग'ची मोहीम चालवली. या मोहिमेअंतर्गत ५००० पेक्षा जास्त टि्‌वट करुन सोडतधारकांनी आपला निषेध ‘सिडको'कडे नोंदवला. तरीही ‘सिडको'ने या प्रश्नाची दखल घेतली नाही. त्यामुळे ‘मनसे'च्या वतीने १२ एप्रिल रोजी सिडको विरोधात भीक मागा आंदोलन केले.

दरम्यान, राज ठाकरे यांनी भेट देऊन आमचा प्रश्न शांतपणे समजावून घेत आश्वस्त केल्यामुळे सिडको सोडतधारकांना आता आपला प्रश्न लवकर सुटेल, अशी आशा वाटू लागली आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नवी मुंबई स्पोर्ट्स क्लबमध्ये एस्ट्रो टर्फ उभारणीवरून वादाची ठिणगी