शहराच्या शाश्वत विकासासाठी ‘केडीएमसी'चे ७ कलमी मुद्दे -आयुक्त गोयल
वाहतूक नियमनासाठी वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जंक्शन बॉक्सची अभिनव संकल्पना
वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात वाहतूक नियमनाच्या दृष्टीने नवी मुंबई महापालिकेच्या वतीने जंक्शन बॉक्स ही अभिनव संकल्पना
नवी मुंबई : वाहतुकाची नेहमीच वर्दळ असलेल्या वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज मध्यवर्ती चौकातील वाहतूक नियमनाच्या दृष्टीने नवी मुंबई महापालिकेच्या वतीने या मध्यवर्ती चौकात जंक्शन बॉक्स ही अभिनव संकल्पना राबविण्यात आली आहे. या जंक्शन बॉक्सव्दारे वाहतुकीचा प्रवाह सुयोग्य रितीने नियंत्रित राहणार आहे. त्यामुळे जंक्शन नेहमी मोकळे राहुन वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे. वाशीतील शिवाजी महाराज चौकात प्रायोगिक तत्वावर जंक्शन बॉक्स तयार करण्यात आला असून तेथील उपयोगिता लक्षात घेऊन शहरातील इतरही मुख्य व वर्दळीच्या चौकांमध्ये जंक्शन बॉक्स संकल्पना राबविण्यात येणार आहे.
वाहतूक पोलिसांच्या सुचनांनुसार नवी मुंबई महापालिकेच्या अभियांत्रिकी विभागामार्फत शहरातील वाहतुकीचे नियमन करण्याच्या दृष्टीने विविध उपाययोजना करण्यात येत असतात. अशाच प्रकारची जंक्शन बॉक्स ही एक अभिनव संकल्पना वाहतूक नियमनाच्या दृष्टीने महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनानुसार वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात राबविण्यात आली आहे. या जंक्शन बॉक्सव्दारे वाहतुकीचा प्रवाह सुयोग्य रितीने नियंत्रित होणार असून सहसा वाहनांची वर्दळ असलेले व्यस्त चौक, क्रॉस रोड्स, टी जंक्शन्स अशा ठिकाणी ते बसविले जातात.
ज्या ठिकाणी वाहतूक नियंत्रण करणा-या ट्रफिक सिग्नलसारख्या नियंत्रण व्यवस्था उपलब्ध असूनही वाहतूक सुरळीत राहत नाही व स्थीर वाहने अडथळा निर्माण करतात त्याठिकाणी बॉक्स जंक्शनचा मोठया प्रमाणावर उपयोग होतो. जंक्शन बॉक्समध्ये वाहनांना थांबण्यास प्रतिबंध असल्याने जंक्शन नेहमी मोकळे राहतात आणि वाहतूक सुरळीत होण्यास मदत होते. जंक्शन बॉक्सबाबत कोड ऑफ प्रॅक्टीस रोड मार्किंग अंतर्गत नियमाची तरतूद आहे. नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील वाहतूक नियमनाच्या दृष्टीने प्रायोगिक तत्वावर वाशी येथील मध्यवर्ती छत्रपती शिवाजी महाराज चौकात जंक्शन बॉक्स तयार केला असून तेथील उपयोगिता लक्षात घेऊन शहरातील इतरही मुख्य व वर्दळीच्या चौकांमध्ये जंक्शन बॉक्स संकल्पना राबविण्याचे नियोजन असल्याची माहिती शहर अभियंता संजय देसाई यांनी दिलेली आहे.