शहराच्या शाश्वत विकासासाठी ‘केडीएमसी'चे ७ कलमी मुद्दे -आयुक्त गोयल
खारघर शहराचा कायापालट; रहिवाशांची दुर्गंधीतुन सुटका
महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा; खारघर शहराचा कायापालट
खारघर ः खारघर मध्ये आज १६ एप्रिल रोजी होणाऱ्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्यानिमित्त पनवेल महापालिका प्रशासनाने खारघर मधील रस्त्यांच्या पदपथ आणि दुभाजक मध्ये एलईडी दिव्ो बसविल्यामुळे, रस्त्यावर केलेल्या डांबरीकरणामुळे, महापालिकेचे स्वच्छता दूत आणि श्री सदस्यांनी केलेल्या साफसफाईमुळे खारघर शहर स्वच्छ आणि सुंदर दिसू लागले असून, खारघर शहराचे रुपडे पालटल्याचे चित्र दिसत आहे.
खारघर मध्ये होणाऱ्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी लाखो श्री जनसमुदाय जमा होणार असून, सिडको, पनवेल आणि नवी मुंबई महापालिका प्रशासनाने सतर्क राहावे अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्यानंतर जागे झालेल्या पनवेल महापालिका प्रशासनाने खारघर मधील मुख्य रस्ते, चौक, सेंट्रल पार्क परिसरातील रस्त्यावर एलईडी दिवे लावल्याने खारघर शहर आणि रस्त्यावर झगमगाट पसरला आहे. मुख्य आणि अंतर्गत रस्त्यावर खड्डे पडले होते. रस्त्यावर दिवसा-रात्री डांबरीकरण करण्याचे काम केल्यामुळे खारघर मधील खड्डेमय मुख्य आणि अंतर्गत रस्ते गुळगुळीत झाले आहेत. खारघर कार्पोरटसाठी राखीव असलेल्या जागेवर पनवेल महापालिकेकडून गेल्या पाच-सहा वर्षांपासून वसाहती मधील घनकचरा टाकला जात होता. त्यामुळे दुर्गंधी पसरत असल्यामुळे रहिवासी त्रस्त होते. याबाबत अनेकांनी महापालिकेकडे लेखी तक्रार केली होती. मात्र, महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्या निमित्त सदर कचरा उचलून परिसर स्वच्छ करण्यात आला आहे. सेंट्रल पार्क भाग-२ मधील मोकळ्या मैदानावर डेब्रिजचे ढिगारे साचले होते. मोकळ्या मैदानात रात्रीच्या वेळी काही मद्यपी मद्य प्राशन करुन बॉटल, प्लास्टिक पिशवी फेकून पसार होत होते. रस्ता दुभाजकात झाडे, झुडपे वाढली होती. महापालिकेने सेंट्रल पार्क स्वच्छ केले तर ‘सिडको'ने खारघर सेंट्रल पार्क मध्ये पोकलन, कामगार लावून सपाटीकरण करून घ्ोतले. स्वच्छतेच्या कामात गेल्या ८ दिवसांपासून श्री सदस्य सहभाग नोंदवून परिसर स्वच्छ करण्यासाठी झटत होते.
खारघर सेक्टर-३० ते सेवटर-३५ परिसरातील मोकळ्या भूखंडावर डेब्रिज कचरा साचला होता. मात्र, श्री सदस्यांच्या वाहनांसाठी सर्व मोकळ्या मैदानाचे सपाटीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे खारघर शहर स्वच्छ आणि सुंदर दिसत आहे. - डॉ. स्वप्नील पवार, रहिवासी - सेक्टर-३४, खारघर.
खारघर मधील उत्सव चौक कडून तळोजा वसाहतकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील बहुतांश पथदिवे बंद होते. सदर रस्त्यावर एलइडी दिवे लावण्यात आले आहेत. - मन्सूर पटेल, सामाजिक कार्यकर्ते - ओवे गाव.
खारघर मधील सेंट्रल पार्क कडून मुर्बी, ओवापेठ आणि रांजणपाडा गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले होते. तसेच बहुतांश पथदिवे बंद होते. रस्त्यावरील खड्डे बुजवून, बंद असलेले पथदिवे सुरु करण्यात आले आहेत. - जयेंद्र शेळके, माजी ग्रामपंचायत सदस्य - खारघर.
‘महाराष्ट्र भूषण' पुरस्कार सोहळ्यासाठी रेल्वे स्थानक ते कार्यक्रम स्थळापर्यंत मोफत बस सुविधा
तुर्भे ः महाराष्ट्र शासन तर्फे आज १६ एप्रिल रोजी सकाळी १०.३० वाजता खारघर सेवटर-२८, २९, ३१ मधील आंतरराष्ट्रीय कार्पोरेट पार्क मैदान येथे ‘महाराष्ट्र भूषण' पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. ज्येष्ठ निरुपणकार डॉ. दत्तात्रेय नारायण उर्फ आप्पासाहेब धम्रााधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण' पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी देशभरातून येणाऱ्या भाविकांना जवळील रेल्वे स्थानक ते कार्यक्रम स्थळी नेण्यासाठी शासनाने विनामूल्य बस सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. यासाठी विविध परिवहन उपक्रमाच्या १ सहस्र १०० बस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अशी माहिती ‘एनएमएमटी'चे महाव्यवस्थापक योगेश कडुसकर यांनी दिली.