नवी मुंबई येथे ‘मनसे विद्यार्थी सेना'च्या वतीने तीन दिवसीय अंडर आर्म क्रिकेट सामन्यांचे आयोजन

‘मनसे'तर्फे अंडरआर्म क्रिकेट सामन्यांचे आयोजन

नवी मुंबई ः अमित राज ठाकरे यांनी गणेश मैदान, जुईनगर, नवी मुंबई येथे ‘मनसे विद्यार्थी सेना'च्या वतीने जुईनगर, सेवटर-२५ मधील गणेश मैदान येथे युवराज चषक-२०२३ या तीन दिवसीय अंडर आर्म क्रिकेट सामन्यांचे आयोजन
करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्‌घाटन ‘मनसे'चे नेते अमित ठाकरे यांच्या हस्ते १४ एप्रिल रोजी करण्यात आले. यावेळी अमित ठाकरे यांनी स्वतः क्रिकेट खेळून सोहळ्याचा आनंद लुटला. याप्रसंगी ‘मनसे'चे सरचिटणीस किर्तीकुमार शिंदे, प्रवक्ते तथा नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे, मनविसे सरचिटणीस अखिल चित्रे, संदीप पाचंगे, ॲड. सायली सोनवणे, मनविसे राज्य सचिव ॲड. अक्षय काशीद, महेश ओवे यांच्यासह नवी मुंबईकर क्रिकेटप्रेमी आणि महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते. यावेळी ‘मनसे'च्या पदाधिकाऱ्यांनी वाशी टोल नाका पासूनच चार चाकी आणि दुचाकी रॅली काढून अमित ठाकरे यांचे नवी मुंबईत स्वागत केले. सदर स्पर्धेत एकूण २० संघ सहभागी होणार असून या स्पर्धेत सर्व सहभागी संघाना ३ साखळी सामने खेळण्याची संधी मिळणार आहे. स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा आज १६ एप्रिल रोजी सायंकाळी पार पडणार आहे, असे मनसे विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष संदेश डोंगरे यांनी सांगितले.

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

खारघर शहराचा कायापालट; रहिवाशांची दुर्गंधीतुन सुटका