आयुष्य बागडण्याचे क्रीडांगण नव्हे, प्रतिकुल परिस्थितीत झुंज देण्याचे रणांगण -ॲड-निकम

मराठी पाऊल पडते पुढे' चित्रपटाचा संगीत प्रकाशन संपन्न

 नवी मुंबई ः आयुष्यात सहजासहजी काहीच मिळत नाही, त्यासाठी संघर्ष करावाच लागतो. मी जेव्हा १९९३ बॉम्बस्फोट खटल्यानिमित्त मुंबईत आलो, तेव्हा बॉम्बस्फोट खटला एक संघटीत गुन्हेगारीची केस होती. त्यामुळे या एवढ्या
मोठ्या शहरात आपला निभाव लागेल का? अशी माझ्या मनात भिती होती. पण, जिद्दआणि संघर्षाचे व्रत घ्ोतले आणि यशस्वी झालो. ‘मराठी पाऊल पडते पुढे' या चित्रपटाचा ट्रेलर पाहून चित्रपट मराठी तरुणांना संघर्ष करण्याची प्रेरणा देणारा असल्याची खात्री झाली आहे, असे गौरवोद्‌गार प्रसिध्द विशेष सरकारी वकील पद्मश्री ॲड. उज्वल निकम यांनी काढले. ‘मराठी बांधकाम व्यावसायिक महासंघ'चे पदाधिकारी प्रकाश बाविस्कर निर्माता
असलेल्या ‘मराठी पाऊल पडते पुढे' या चित्रपटाचा संगीत प्रकाशन सोहळा १३ एप्रिल रोजी मुंबईत पार पडला. या सोहळ्याला ॲड. उज्वल निकम यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. याप्रसंगी
‘मराठी बांधकाम व्यावसायिक महासंघ'चे अध्यक्ष सुरेश हावरे, निर्माता प्रकाश बाविस्कर, लेखक-दिग्दर्शक स्वप्नील मयेकर, चित्रपटातील कलाकार आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

आयुष्य बागडण्याचे क्रीडांगण नसून प्रतिकुल परिस्थितीत झुंज देण्याचे रणांगण आहे, असा संदेश सदर चित्रपटाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचेल. संगीतही श्रवणीय आहे. शीर्षकगीत मनाला प्रेरणा देणारे आहे. आत्मविश्वास
संघर्ष करण्याची प्रेरणा देतो आणि हीच प्रेरणा ‘मराठी पाऊल पडते पुढे' चित्रपटातून मिळेल, असे ॲड. उज्ज्वल निकम यावेळी म्हणाले. मराठी माणूस केवळ नोकरीत रमणारा नाही तर व्यवसायात उतरुन नोकऱ्या देणारा
होऊ शकतो. महाराष्ट्रात केवळ आणि केवळ मराठी माणसाचाच डंका वाजला पाहिजे, असे वातावरण सदर चित्रपट निर्माण करेल, अशी अपेक्षा सुरेश हावरे यांनी मनोगतातून व्यवत व्ोÀली.

‘मराठी पाऊल पडते पुढे' येत्या ५ मे रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून येणाऱ्या निव्वळ नपयातून दहा टक्के चित्रपटातील कलाकारांना आणि उर्वरीत भाग मराठी तरुणांना व्यवसाय
मार्गदर्शनासाठी, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी, वृध्दाश्रमासाठी देऊ केला आहे. म्हणून चित्रपट आपण आवर्जून पाहावा. लकी ड्रॉ तिकीट मिळविण्यासाठी ८९५५४४११३३ या क्रमांकावर मिस्ड कॉल द्या,  असे
आवाहन निर्माता प्रकाश बाविस्कर यांनी केले आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नवी मुंबई येथे ‘मनसे विद्यार्थी सेना'च्या वतीने तीन दिवसीय अंडर आर्म क्रिकेट सामन्यांचे आयोजन