डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी नागरिकांची गर्दी

 ऐरोलीत बाबासाहेबांच्या ज्ञानसंपन्न विचारांचा जागर

नवी मुंबई ः भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती देशभरात मोठ्या उत्साहात साजरी झाली. ऐरोली येथील नवी मुंबई महापालिकेच्या वतीने ऐरोली मधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात अनोख्या पध्दतीने बाबासाहेबांना आदरांजली वाहण्यात येते. बाबासाहेबांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून ‘जागर-२०२३' या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून बाबासाहेबांचे व्यक्तिमत्व, त्यांचे कार्य, सर्वसामन्य जनतेपर्यंतपर्यंत पोहोचवण्याचे काम विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या व्याख्यानातून केले जात आहे. त्यामुळे या स्मारकाचा उल्लेख ज्ञानस्मारक म्हणून केला जातो.

या ज्ञानस्मारकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हजाराेंच्या संख्येने नागरिकांनी भेट देऊन बाबासाहेबांना अभिवादन केले. याठिकाणी पाच हजाराहुन अधिक नागरिकांनी भेट दिली.  विविध वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असलेल्या सदर स्मारकामध्ये बाबासाहेबांचा संपूर्ण जीवनपट डोळ्यासमोर उभा राहत आहे, असे इथे भेट देणारे नागरिक
सांगतात. यापूर्वी कधीच न पाहिलेले बाबासाहेबांचे फोटो, त्यांनी लिहिलेली दुर्मिळ पत्रे, त्यांच्या जीवनातील घडलेल्या महत्वाच्या घटना आणि त्यांची कधी न पाहिलेली छायाचित्रे बघण्यासाठी नागरिकांची गर्दी आज पाहायला मिळाली. स्मारकामध्ये बाबासाहेबांच्या जीवनचरित्राचे दर्शन घडविणाऱ्या दुर्मिळ छायाचित्रांचे दालन पाहून बाबासाहेबांचा जीवनप्रवास प्रत्यक्ष पाहत एक वेगळा अनुभव भेट देणारे नागरिक घ्ोऊन जात आहेत.

स्मारकात असलेल्या ऑडिओ व्हिज्युअल सुविधांनी परिपूर्ण ई-लायब्ररीसह समृध्द ग्रंथालयाच्या माध्यमातून बाबासाहेबांच्या ग्रंथसंपदेचा हिमालय किती मोठा आहे, याची प्रचिती नागरिकांनी घ्ोतली. भेट देणाऱ्या अनेकांनी या समृध्द ग्रंथालयात बाबासाहेबांची पुस्तके वाचत बाबासाहेबांना अभिप्रेत असलेली अशी वाचन संस्कृती स्वतःमध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला. अत्याधुनिक होलोग्राफीक आभासी चलचित्रप्रणाली द्वारे बाबासाहेबांचे प्रत्यक्ष असलेले भाषण अनेकांना मंत्रमुग्ध करत आहे. ‘संविधान'चे महत्त्व जाणून घ्ोण्यासाठी संविधान कक्षात विशेष गर्दी पाहायला मिळाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य, त्यांच्या व्यक्तिमत्वाचे असंख्य पैलू इथून बाहेर पडताना नागरिक घ्ोऊन जात आहेत. यंदा जयंतीदिनी तब्बल ५ हजाराहून अधिक नागरिकांनी भेट देऊन बाबासाहेबांना वैचारिक आदरांजली वाहिली. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

आयुष्य बागडण्याचे क्रीडांगण नव्हे, प्रतिकुल परिस्थितीत झुंज देण्याचे रणांगण -ॲड-निकम