आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडून शहीद स्मृतीस्तंभास पुष्पचक्र अर्पण

महापालिका अग्निशमन दलातर्फे अग्निशमन दिन साजरा

नवी मुंबई ः १४ एप्रिल १९४४ रोजी मुंबई बंदरातील व्हिक्टोरीया गोदीत एक नंबर धक्क्यावर असलेल्या एस.एस. पोर्ट स्टिकीन या जहाजाला लागलेल्या भीषण आगीशी झुंज देताना अग्निशमन दलाचे ६६ अधिकारी आणि जवान शहीद झाले होते. त्या आणि त्यानंतरच्या काळातही अग्निविमोचन सेवा करताना शहीद झालेल्या जवानांच्या शौर्याला सन्मान करीत १९६८ पासून १४ एप्रिल रोजी राष्ट्रीय अग्निशमन सेवा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. त्याअनुषंगाने नवी मुंबई महापालिकेच्या वतीने अग्निशमन दिनी वाशी अग्निशमन केंद्रात महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या हस्ते शहीद स्मृतीस्तंभास पुष्पचक्र अर्पण करुन आदरांजली वाहण्यात आली. याप्रसंगी महापालिका अग्निशमन विभागप्रमुख तथा अतिरिक्त शहर अभियंता शिरीष आरदवाड, विभागीय अग्निशमन अधिकारी पुरुषोत्तम भोईर, केंद्र अधिकारी जे.टी.पाटील, सुशविरकर, सहा. केंद्र अधिकारी ए. आर. भोईर, व्ही. डी. कोळी आणि अग्निशमन जवान यांच्या हस्ते स्मृतीस्तंभास पुष्पचक्र अर्पण करण्यात आली.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नवी मुंबई शहर सुरक्षेसाठीचा सीसीटीव्ही प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालू होण्यास मे महिना उजाडणार