पुणे-जुन्नर मधील आंबेगाव याठिकाणी झालेल्या गारपीटमुळे २५ टक्वे आंबे गळती ; यंदा आंबा उत्पादनावर परिणाम

यंदा जुन्नर हापूस आंबा उत्पादनात घट

वाशी ः कोकण आणि दक्षिण भारतातील हापूस आंबा हंगाम संपता संपता वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) फळ मार्केट मध्ये मे अखेर किंवा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जुन्नर हापूस आंबा दाखल होण्यास सुरुवात होते. मात्र, मागील चार-पाच दिवसांपूर्वी पडलेल्या अवकाळी पावसामुळे तसेच पुणे-जुन्नर मधील आंबेगाव याठिकाणी झालेल्या गारपीटमुळे २५ टक्वे आंबे गळती झाली आहे. त्यामुळे यंदा आंबा उत्पादनावर परिणाम होणार आहे.

वाशी मधील एपीएमसी फळ बाजारात में अखेर कोकणातील हापूस आंबा हंगाम संपताच जून महिन्याच्या सुरुवातीलाच जुन्नर हापूस आणि केशर आंबा हंगाम सुरु होतो. जुन्नर येथील हापूस आंबा तयार होण्याच्या प्रक्रियेत आहे. परंतु, ऐन हंगामात अवकाळी पाऊस तर काही ठिकाणी गारपीट झाल्याने आंबा उत्पादनाला फटका बसला आहे, अशी माहिती आंबा उत्पादक शेतकरी सत्यवान गायकवाड यांनी दिली.

अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पाण्यात गेला आहे. २५ टक्े आंबे गळती झाली आहे. गळून पडलेल्या आंब्यात कीड तयार होऊन आंबा खराब होतो. त्यामुळे जुन्नर येथील शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले असून, आंब्यासाठी केलेला खर्च देखील भरुन निघण्याची आशा मावळली आहे. परिणामी यंदा ऐन हंगामात आंब्याचे उत्पादन घटणार आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडून शहीद स्मृतीस्तंभास पुष्पचक्र अर्पण