‘आप तर्फे ऐरोली, दिघा, तुर्भे, कोपरखैरणे, वाशी आणि नेरुळ विभागातील पोलीस ठाण्यांना सदिच्छा भेट

‘आप नवी मुंबई'तर्फे पोलीस अधिकाऱ्यांना संविधान पुस्तक भेट

नवी मुंबई ः ‘टीम आप नवी मुंबई'तर्फे कुठलाही राष्ट्रीय कार्यक्रम साजरा करताना पारंपरिक म्युझिक, डान्स, डीजे आदिंना बगल देऊन कार्यक्रम अभिनव आणि जनताभिमुख मार्गाने साजरा करण्यावर भर दिला जातो. त्याअनुषंगाने ‘आप'तर्फे यावर्षीी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती निमित्त नवी मुंबई मधील पोलीस अधिकाऱ्यांना ‘संविधान' पुस्तक भेट देण्याचा उपक्रम राबविण्यात आला. ‘आप नवी मुंबई'च्या विविध टीम तर्फे ऐरोली, दिघा, तुर्भे, कोपरखैरणे, वाशी आणि नेरुळ विभागातील पोलीस ठाण्यांना सदिच्छा भेट देऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना संविधान पुस्तक भेट देण्यात आले. ‘आप'च्या ऐरोली-दिघा टीम तर्फे देवराम सुर्यवंशी, संतोष केदारे, दिनेश ठाकूर, राहुल पगारे, कर्तव्य पगारे यांनी रबाले पोलीस ठाणे येथे, तुर्भे विभागात तुर्भे नोड उपाध्यक्ष शंकर पडूळकर आणि त्यांच्या टिमने तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाणे येथे, कोपरखैरणे मध्ये सुमित कोटियन, नीना जोहरी, अभिषेक पांडे, राहुल मेहरोलिया यांनी, वाशी विभागात ‘आप'चे नवी मुंबई कार्यकारी अध्यक्ष श्यामभाऊ कदम, डॉ. राकेश शर्मा, यतीन बन्सल, हर्षल राणे, महादेव गायकवाड, सुलोचना शिवानंदन, ॲड. सुवर्णा जोशी, कल्याणी यांनी तर नेरुळ टीम तर्फे चिन्मय गोडे, डॉ. प्रो. विलास उजगरे, स्नेहा उजगरे, सुधीर पांडे, प्रीतम सिंग धर, रेखा धर, महेश क्षीरसागर, स्नेहल क्षीरसागर आदि पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी आपल्या विभागातील स्थानिक पोलीस ठाणेला सदिच्छा भेट देऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना ‘संविधान' पुस्तक भेट दिले.

दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यानी लिहिलेले आपल्या देशाचे संविधान देशातील प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याचा हक्क देते. पण, दुर्देवाने आज स्वात्यंत्र प्राप्तीला ७५ वर्षे उलटून सुध्दा ‘संविधार्न'ने दिलेल्या या हक्काबद्दल म्हणावी तशी जागरुकता जनतेमध्ये आलेली नाही. आम आदमी पार्टी एक संविधान प्रेमी, धर्म-जाती निरपेक्ष, निःस्वार्थी आणी देशप्रेमी सामान्य नागरिकांचे संघटन आहे. संविधान प्रत्येक चिमुकल्याला चांगल्या आणी मोफत शिक्षणाचा हक्क देते. त्यामुळेच अरविंद केजरीवाल यांच्या दिल्ली मधील सरकारने शून्य भ्रष्टाचाराचे प्रभावी धोरण आखून सरकारी शिक्षण आणि आरोग्य व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवत ‘संविधान'ने दिलेल्या नागरी हक्काचे संरक्षण केले आहे, असे श्यामभाऊ कदम यांनी सांगितले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पुणे-जुन्नर मधील आंबेगाव याठिकाणी झालेल्या गारपीटमुळे २५ टक्वे आंबे गळती ; यंदा आंबा उत्पादनावर परिणाम