तीन दिवस नवी मुंबई मध्ये पाण्याचे दुर्भिक्ष्य

देखभाल, दुरुस्तीचे नियोजन फसल्याने पाण्याविना नागरिकांचे प्रचंड हाल ?

वाशी ः नवी मुंबई महापालिका तर्फे १० एप्रिल रोजी जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घ्ोण्यात आले होते. मात्र, या कामाचे नियोजन पुरते फसल्याने दोन दिवस नवी मुंबई शहरात पाणीबाणी निर्माण झाली होती. त्यामुळे पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाल्याने एखाद्या दुष्काळ ग्रस्त भागाप्रमाणे नवी मुंबईकर पाण्यासाठी वण वण फिरताना दिसत होते.

जलवाहिनी आणि पाणीपुरवठा केंद्राच्या दुरुस्तीसाठी १० एप्रिल पासून तीन दिवस नवी मुंबई मध्ये पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाल्याने नागरिकांना पाण्याचा शोध घ्ोण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागले. वाढत्या तापमानामुळे नागरिक हैराण असताना या वातावरणात तहान भागवण्यासाठी विकतचे पाणी अनेकांनी घ्ोतले. मात्र, घरात पाण्याचा एक थेंब नसल्याने अखेर नागरिक विशेषतः महिला हंडे, बादली असे मिळेल ते साहित्य घ्ोवून पाण्याच्या शोधत वणवण हिंडत होते. कोपरखैरणे सेक्टर-५ ते सेवटर-८ मधील उद्यानात पाण्यासाठी गर्दी उसळल्याने पाण्याच्या तात्पुरत्या टंचाईने नागरिकांचे अत्यंत हाल झाले. राज्यातील दुसरी स्वमालकीचे धरण असलेली नवी मुंबई महापालिका अशी स्वतःची पाठ थोपटून घ्ोणाऱ्या नवी मुंबई शहरातील नागरिकांचे पाण्याअभावी  चांगलेच हाल झाले. गृह संकुलामध्ये पाण्याचे टँकर मागविण्याची वेळ नवी मुंबई शहरातील जनतेवर आली. ११ एप्रिल रोजी सायंकाळ पर्यंत दुरुस्तीचे काम सुरु राहिल्याने असल्याने १२ एप्रिल रोजी पहाटे कमी दाबाने पाणी पुरवठा झाला. मात्र, १२ एप्रिल रोजी सकाळ पासून नळ पुंन्हा कोरडे पडले. देखभाल, दुरुस्तीचे नियोजन फसल्याने पाण्यासाठी नवी मुंबईकरांना खूप हाल सोसावे लागले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘सिडको'च्या कार्मिक विभागाचे गत १० वर्षाचे लेखापरीक्षण करण्याचे आदेश