सीबीडी येथे वीर सावरकर मैदानात उभारण्यात येणाऱ्या समाजमंदिराचे भूमीपुजन संपन्न

सीबीडी मध्ये गजेबो उद्यान, फाऊंटनचे लोकार्पण; समाजमंदिराचे भूमीपुजन

नवी मुंबई ः ‘बेलापूर'च्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या आमदार निधीतून सीबीडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात ज्येष्ठ नागरिकांसाठी गजेबो उद्यान तसेच डॉ. हेडगेवार उद्यान (मँगो गार्डन) येथे फाऊंटन उभारण्यात आले आहे. या सुविधांचा शुभारंभ तसेच सीबीडी, सेवटर-८ मधील वीर सावरकर मैदानात आदिवासी समाजाकरिता उभारण्यात येणाऱ्या समाजमंदिराचा भूमीपुजन सोहळा आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ नागरिक कमल शर्मा आणि मनोहर बाविस्कर यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. याप्रसंगी ‘भाजपा'चे जिल्हा महामंत्री तथा बेलापूर विधानसभा संयोजक निलेश म्हात्रे, माजी नगरसेवक अशोक गुरखे, साबू डॅनियल, स्वाती गुरखे-साटम, विलास कदम, राधा ठाकूर, रुक्मिणी पळसकर, स्मिता सावंत, संतोष पळसकर, संजय ओबेरॉय, यशपालसिंग बागल, अलका कामत, सुरेखा बामणकर तसेच स्थानिक महिला आणि ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.

डॉ. हेगडेवार उद्यान मँगो गार्डन म्हणून नावारुपास आलेले आहे. डॉ. हेगडेवार यांनी निर्माण केलेल्या पक्षात काम करून समाजसेवा करताना आनंद होत आहे. आज सीबीडीमध्ये गजेबो उद्यान, फाऊंटनचे लोकार्पण झाले. तसेच सेक्टर-८ येथील आदिवासी लोकवस्ती असलेल्या शेजारी वीर सावरकर मैदानात उभारण्यात येणाऱ्या समाजमंदिराचे भूमीपुजन संपन्न झाले. वास्तविक पाहता सीबीडीवासियांनी मला न मागताच खूप काही दिले आहेे. त्या मानाने मी त्यांचे खूप काही देणे लागत आहे.  माझे १९९५ पासूनचे सहकारी साबू डॅनियल, अशोक गुरखे यांचेही सीबीडीच्या विकासात खूप मोठे योगदान आहे. सीबीडीकर रहिवाशांचे आशीर्वाद तसेच व्यापाऱ्यांनी दिलेली साथ यामुळे मी आजवर आमदारकी पर्यंत मजल मारली आहे, असे आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले.

सीबीडी, सेक्टर-८ येथील दलित वस्तीसाठी सुमारे २ कोटींचा निधी मंजूर करुन आणला आहे. लवकरच सदर ठिकाणी येथे सोयी-सुविधा पुरविण्यात येणार असून तुम्ही फक्त कामे सूचवा; जिथे निधीची आवश्यकता असेल तिथे निधीची शासनामार्फत तरतूद करुन घेईन, अशी ग्वाही आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांनी यांनी यावेळी दिली.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नवी मुंबईत रस्त्याचा ताबा घेण्यासाठी वाहन चालकांची नामी शक्कल