‘संघर्षमय यथोगाथा' चे प्रकाशन

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते डॉ.सुदर्शन रणपिसेलिखित पुस्तक प्रकाशित

नवी मुंबई : सीबीडी येथील डॉ. सुदर्शन रणपिसेलिखित ‘संघर्षमय यशोगाथा' या आत्मचरित्रपर पुस्तकाचा प्रकाशन सोहळा  नामदार केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांच्या हस्ते विष्णुदास भावे नाट्यगृहात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतीदिनाचे औचित्य साधून ११ एप्रिल रोजी पार पडला.

 याप्रसंगी विचारमंचावर आरपीआयचे नवी मुंबई अध्यक्ष महेश खरे सिद्राम ओहोळ, सौ. उर्मिला रणपिसे व इतर मान्यवर उपस्थित होते. पुस्तक प्रकाशन सोहळ्यानिमित्त डॉ रणपिसे यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांचे बंधू डॉक्टर भानुदास तसेच डॉक्टर तुषार, डॉक्टर दीपा, डॉक्टर धुमाळ, प्राचार्य पवार, सेवानिवृत्त एक्साईज आयुवत अरुण खडतरे, नवी मुंबई पोलीस अधिकारी संघटनेचे अध्यक्ष कांबळे, पोलिस अधिकारी सावंत, पत्रकार विश्वरथ नायर, स्वप्ना हरळकर यांच्यासह समाजाच्या विविध स्तरातील मित्रमंडळींनी उपस्थिती दर्शवली होती.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

सीबीडी येथे वीर सावरकर मैदानात उभारण्यात येणाऱ्या समाजमंदिराचे भूमीपुजन संपन्न