विवेकानंद संकुलात सुलेखनकार विलास समेळ यांची सुंदर हस्ताक्षर कार्यशाळा

सुंदर अक्षरांच्या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना सुलेखनकारांचे मार्गदर्शन

नवी मुंबई : विवेकानंद संकुल सानपाडा येथील प्राथमिक विद्यालयात १० आणि ११ एप्रिल रोजी सुलेखनकार अक्षरविलास विलास समेळ यांची इयत्ता ३री ४ थी आणि इयत्ता ५ वी, ६वी ७ वीच्या एकूण १८५ विद्यार्थ्यांसाठी ‘सुंदर हस्ताक्षर' कार्यशाळा आयोजित केली होती.

 ११ एप्रिल रोजी असणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती त्यानिमित्त त्यांच्या तसबीरीला पुष्पहार अर्पण करुन कार्यशाळेचा शुभारंभ झाला. अक्षर कसे काढावे, अक्षराची वळणे, अक्षर काढताना काना, मात्रा, वेलांटी, उकार, रफार अक्षराची उंची वगैरे बाबत प्रात्यक्षिकासह सदर कार्यशाळेत मार्गदर्शन केले. मुलांना एक तक्ता देऊन त्यांच्याकडून काही अक्षरे काढून घेताना त्यातील चुकीची वळणे आणि मूळ अक्षर कसे असावे हे दाखवण्यात आले. यावेळी निरनिराळ्या अक्षरांचे नमुने असलेल्या पेपरबॅग, फुकट गेलेल्या लग्नपत्रिकांमधून तयार केलेली ग्रीटिंग कार्ड्‌स, अगरबत्तीच्या रिकाम्या खोक्यांवर केलेलं लेखन तसेच काही सुलेखनाचे नमुने आणि स्वतः हस्ताक्षरात लिहून काढलेलं साप्ताहिक वगैरे विविध प्रकारच्या साहित्याचे प्रदर्शन मांडले होते. शाळेच्या मुख्याध्यापिका आणि शिक्षकांसह विद्यार्थ्यांनी सदर प्रदर्शन पाहून समाधान व्यक्त केले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘संघर्षमय यथोगाथा' चे प्रकाशन