बेलापूर, सेक्टर ११ येथील खाऊ गल्ली मध्ये मार्जिनल स्पेसचा मोठा वापर होत असल्याने मनपाची कारवाई

सीबीडी येथे मनपाच्या किऑस्कवर मनपाची कारवाई !

सीबीडी : सीबीडी येथील किऑस्कचालकांनी महापालिके सोबत केलेल्या करारातील अटी आणि शर्ती यांचा भंग केल्याने त्यांच्यावर कारवाई केली आहे, अशी माहिती बेलापूर विभाग कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त शशिकांत तांडेल यांनी दिली. अतिक्रमण विभागाचे उपायुक्त अमरीश पटनिगिरे यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आल्याचे तांडेल यांनी सांगितले.

बेलापूर विभाग कार्यालयातच्या अंतर्गत असणारे सेक्टर ११ येथील खाऊ गल्ली मध्ये मार्जिनल स्पेसचा मोठा वापर होत असल्याच्या तक्रारी येत होत्या. तसेच अन्य तक्रारी आल्या होत्या. त्यानुसार किऑस्क मधील १२ शेगड्या, ९ सिलेंडर आणि १३ लोखंडी काऊंटर, टेबल व खुर्च्या जप्त करण्यात आल्या आहेत. या ठिकाणी कोणतेही खाद्यपदार्थ बनवण्यासाठी परवानगी नाही. केवळ तयार करून आणलेले खाद्यपदार्थ विक्री करण्यासाठी परवानगी आहे,अशी अट महापालिकेने किऑस्क चालकांशी केलेल्या करारात आहे.

त्यामुळे ही कारवाई करून साहित्य जप्त करण्यात आले आहे, असे तांडेल यांनी स्पष्ट केले. यापुढेही सदर कारवाई नियमितपणे करण्यात येणार असल्याचे तांडेल यांनी यांनी सांगितले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

२५ लाखांहुन श्री सदस्य राहणार उपस्थित; मुख्यमंत्र्यांकडून खारघरमध्ये पाहणी