वाशी येथील महाआरोग्य शिबिरात ७९१ जणांची आरोग्य तपासणी

वाशी मध्ये मोफत महाआरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

नवी मुंबई ः ‘बेलापूर'च्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या माध्यमातून वाशी, सेवटर-१५ मध्ये मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबिराला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. यावेळी एकूण ७९१ नागरिकांनी लाभ घ्ोतला. भारतीय जनता पार्टीच्या सौजन्याने तसेच नवी मुंबई वेल्फेयर फाऊंंडेशन यांच्या सहकार्याने तसेच हिरानंदानी फोर्टिस हॉस्पिटल वाशी, ॲडव्हान्स आय क्लिनिक (अेही) सानपाडा यांच्या संयुक्त विद्यमाने सदर मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. महाआरोग्य शिबिरामध्ये रक्तदाब, डायबिटीस, बीएमआय, ईसीजी, डोळ्यांची तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला, मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या तसेच मोफत औषधे, च्यवनप्राश आणि मोफत चष्म्याचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी ‘भाजपा'चे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, जिल्हा महामंत्री तथा बेलापूर विधानसभा संयोजक निलेश म्हात्रे, अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष विकास सोरटे, समाजसेवक मुकुंद विश्वासराव, माजी नगरसेविका शारदा डोंगरे, प्रमिला खडसे, कल्पना छत्रे, वर्षा झरेकर, महेश दरेकर, ‘नवी मुंबई वेल्फेयर फाऊंडेशन'चे अध्यक्ष गणेश पाटील, प्रवीण भोईर, सायली म्हात्रे तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते. 

वाशी, सेवटर-१५ येथे आयोजित करण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिराला नागरिकांचा उदंड प्रतिसाद पाहून समाधान वाटत आहे. वाशी विभागातील माझ्या अनेक सहकाऱ्यांचे सहकार्य महाआरोग्य शिबीराच्या आयोजनासाठी खूप फायद्याचे ठरले. नागरिकांना मोफत आरोग्य सेवा मिळावी, त्यांना मोफत औषधे उपलब्ध व्हावी, असा सदर आरोग्य तपासणी शिबिरामागचा उद्देश असून मोठ्या संख्येने नागरिक, ज्येष्ठ नागरिक, महिला वर्ग शिबिराचा लाभ घेतला. त्यामुळे नागरिकांनी अशाच रितीने सहकार्य केल्यास लवकरच शहराचा विकास करणे सोपे होईल, असे आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

बेलापूर, सेक्टर ११ येथील खाऊ गल्ली मध्ये मार्जिनल स्पेसचा मोठा वापर होत असल्याने मनपाची कारवाई