नाल्यात बदल किंवा बांधकाम करण्यास मज्जाव असताना नाल्यातच जाहिरात फलक उभारण्याची किमया

कोपरखैरणेतील जाहिरात फलक वादाच्या भोवऱ्यात ?

नवी मुंबई:- शहरातील पावसाच्या पाण्याचा निचरा नैसर्गिक नाल्याद्वारे.होतो.त्यामुळे अशा नाल्यात बदल किंवा बांधकाम करण्यास मज्जाव आहे.मात्र असे असताना देखील कोपरखैरणे विभागात एका जाहिरात ठेकेदाराने नाल्यातच जाहिरात फलक उभारण्याची किमया साधली आहे.

नवी मुंबई शहरात अनियमित बांधकामे होत असताना आता अनियमित जाहिरात फलक देखील उभे राहत आहेत.आणि असाच एक फलक कोपरखैरणे सेक्टर १० आणि १२ च्या मध्ये असलेल्या नाल्यात उभा करण्यात आला आहे. महापालिका अधिनियमानुसार कुठल्याही नैसर्गिक नाल्यात बांधकाम किंवा नाल्याची दिशा बदलता येत नाही. मात्र असे नियम असून देखील सदर ठेकेदाराने नाल्यात जाहिरात फलक उभा करण्याची किमया साधली आहे. त्यामुळे सदर ठेकेदारावर नवी मुंबई महानगर पालिका परवाना विभाग काय कारवाई  करते हे पहावे लागेल.

कोपरखैरणे सेक्टर १० आणि १२ च्या मध्ये असलेल्या नाल्यात .चुकीच्या पद्धतीने जाहिरात फलक लावल्या बद्दल सदर ठेकेदारास पत्र लिहून ते फलक हटवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

डॉ.श्रीराम पवार, उपायुक्त परवाना विभाग. न.मु. म.पा.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

आरोग्य विभागाने गाफील न राहण्याचे आयुवत नार्वेकर यांचे निर्देश