खारफुटीवर अनधिकृत गोशाळा

वन विभागाची गोशाळेवर तोडक कारवाई

वाशी ः वाशी गाव जागृतेश्वर मंदिरामागील खाडीत अवैधरित्या कांदळवनाच्या जागेत खारफुटीची कत्तल करुन त्याजागी अवैध गोशाळा सुरु करण्यात आली होती. या गोशाळेवर वन विभागाच्या वतीने कारवाई करुन एका व्यवतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवी मुंबई शहराला विस्तीर्ण असा खाडीकिनारा लाभला असून त्यामध्ये मोठ्या प्रमाणात कांदळवन खारफुटी आहे. मात्र, काही भूमाफियांकडून अशा खारफुटीवर डेब्रीज टाकून खारफुटीची सर्रास कत्तल केली जात आहे. तसेच खारफुटीवर डेब्रीज टाकल्यानंतर त्या ठिकाणी झोपड्या, अनधिकृत बांधकाम करुन ते भाड्यावर देण्याचे प्रकार सुरु आहेत. अशाच प्रकारे वाशी गांव जागृतेश्वर मंदिरामागे २२७८ चौरस मीटर जागेतील कांदळवनावर डेब्रीजचा भराव टाकून त्या जागेवर गोशाळा बांधण्यात आली होती. या गोशाळेवर कांदळवन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ६ एप्रिल रोजी पोलीस बंदोबस्तात तोडक कारवाई  केली. तसेच विना परवाना कांदळवन नष्ट करुन बांधकाम केल्याप्रकरणी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती वन अधिकारी दीपक चव्हाण यांनी दिली. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

शाळेचे मैदान खाजगी संस्थेला आंदण?