सिने अभिनेत्री मलायका अरोरा उद्‌घाटन सोहळ्याचे मुख्य आकर्षण

‘बीएएनएम'च्या प्रॉपर्टी प्रदर्शनाला सुरुवात

नवी मुंबई ः  कॉन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया(क्रिडाई)-बिल्डर्स असोसिएशन ऑफ नवी मुंबई (बीएएनएम) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या २१ व्या मेगा प्रॉपर्टी प्रदर्शनाला वाशीतील सिडको एविझबिशन सेंटर येथे सुरुवात झाली आहे. या प्रॉपर्टी प्रदर्शनाचे उद्‌घाटन ७ एप्रिल रोजी आमदार गणेश नाईक आणि आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. या प्रॉपर्टी प्रदर्शनाच्या उद्‌घाटन समारंभाचे मुख्य आकर्षण हिंदी सिने जगतातील सुप्रसिध्द अभिनेत्री मलायका अरोरा हिची उपस्थिती ठरली. सदर प्रदर्शन येत्या १० एप्रिल पर्यंत सुरु राहणार आहे.

याप्रसंगी ‘क्रेडाई-बीएएनएम'चे अध्यक्ष वसंत भद्रा, मनिष भतिजा, माजी अध्यक्ष  देवांग त्रिवेदी, खजिनदार करण सबलोक, धर्मेंद्र कारिया, सुरेंद्रभाई ठक्कर, हरिश छेडा, सचिन अग्रवाल, भुपेन शहा, जिगर त्रिवेदी, मनिष शाह यांच्यासह शेकडो नामांकित बांधकाम व्यावसायिक उपस्थित होते. क्रेडाई-बीएएनएम आयोजित सदर २१ व्या प्रॉपर्टी प्रदर्शनामध्ये शेकडो नामांकित बांधकाम व्यावसायिक सहभागी झाले आहेत.  सर्वसामान्य घर खरेदीदाराला नजरेसमोर ठेवून २० लाखापासून ते अत्याधुनिक सुविधा असणारे १५ कोटी किंमतीपर्यंतचे लक्झरी पलॅटस्‌ या प्रदर्शनात उपलब्ध असल्याचे ‘क्रेडाई-बीएएनएम'चे अध्यक्ष वसंत भद्रा यांनी सांगितले.

क्रेडाई-बीएएनएम यांच्या संयुक्त विद्यमाने गेली २० वर्ष मेगा प्रॉपटी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते. कोव्हीड संसर्गामुळे मागील दोन वर्षे प्रॉपटी प्रदर्शन आयोजित करण्यात आले नाही. त्यानंतर यंदा ७ ते १० एप्रिल दरम्यान वाशी रेल्वे स्टेशन समोर सिडको एक्झिबेशन सेंटर येथे २१ व्या प्रॉपर्टी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. नवी मुंबई, ‘सिडको'च्या नयना प्रकल्पात उभ्या असलेल्या आणि सुरु असलेले तसेच भविष्यात निर्माण होणाऱ्या आपल्या प्रकल्प बांधकाम व्यावसायिकांनी प्रदर्शनाद्वारे विक्रीसाठी उपलब्ध करुन दिले आहेत. सदर प्रॉपटी प्रदर्शनात मागील वर्षी मोठा प्रतिसाद लाभला होता याही वर्षी  उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून १०० हुन अधिक  बांधकाम व्यावसायिकांनी प्रदर्शनात सहभाग घेतला आहे. याशिवाय नागरिकांना घर खरेदीसाठी कर्ज उपलब्ध करुन देणाऱ्या विविध वित्तीय कंपन्यांचे स्टॉल्स प्रदर्शनात उपलब्ध करुन देण्यात  आले आहेत.


सदर प्रॉपर्टी प्रदर्शनात शेकडो बिल्डरांनी नेरल, खोपोली, कर्जत, रोहिंजग, तळोजा, पुष्पकनगर, द्रोणागिरी, उरण, उलवे, पामबीच एनआरआय, पामबीच सानपाडा, घणसोली, नेरुळ, आदि ठिकाणी असलेले आपले महत्वाकांक्षी गृहप्रकल्प सादर केले  असून नागरिकांनी मोठ्या उत्साहाने प्रदर्शनात सहभागी होऊन आपल्या स्वप्नातील घर बुक करावे, असे ‘क्रेडाई'चे वसंत भद्रा  यांनी केले.

दरम्यान, २१ व्या प्रॉपर्टी प्रदर्शनाचे डेल्टा ग्रुप मुख्य संयोजक तर पॅराडाईज ग्रुप आणि डीडीएसआर ग्रुप मुख्य प्रायोजक, सह-प्रायोजक सुरींदर सबलोक (कामधेनु रिॲलिटीज), अरिहंत सुपरस्ट्रक्चर्स लि. आणि टेस्कॉन ग्रीन असे नामांकित ग्रुप आहेत.

क्रेडाई बीएएनएम प्रदर्शनात घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांना अत्याधुनिक मूलभूत सुविधा (शाळा, कॉलेज, हॉस्पिटल, सुसज्ज उद्यान, पार्किंग, मार्केट) बांधकाम उद्योजक जवळच उपलब्ध करुन देणार आहेत. येथे सामान्य घरखरेदीदार नजरेसमोर ठेऊन  सर्वसामान्य घर खरेदीदाराला नजरेसमोर ठेवून २० लाखापासून ते अत्याधुनिक सुविधा असणारे १५ कोटी किंमत असलेले लक्झरी पलॅटस्‌ प्रदर्शनात उपलब्ध आहेत. -वसंत भद्रा, अध्यक्ष-क्रेडाई-बीएएनएम.


 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पाणी देयक वसुलीसाठी महापालिकातर्फे विविध उपाययोजनांची अंमलबजावणी