राजेश पाटील यांना गिरणा गौरव पुरस्कार

सिडको'चे सह-व्यवस्थापकीय संचालक राजेश पाटील यांना गिरणा गौरव पुरस्कार

नवी मुंबई ः ‘सिडको'चे सह-व्यवस्थापकीय संचालक राजेश पाटील यांना गिरणा गौरव या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे. सदर पुरस्काराबद्दल सिडको एम्प्लॉईज युनियन तसेच सिडको प्रकल्पग्रस्त कर्मचारी वेल्फेअर असोसिएशन यांच्या वतीने सह-व्यवस्थापकीय संचालक राजेश पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.

आजवर अनेक मान्यवरांना गिरणा गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. सह-व्यवस्थापकीय संचालक राजेश पाटील यांच्या प्रशासकीय सेवेतील उत्कृष्ट कारकिर्दीबद्दल गिरणा गौरव असा प्रतिष्ठेचा पुरस्कार ५ एप्रिल रोजी नाशिक येथे आयोजित कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. यामुळे राजेश पाटील यांच्या प्रशासन क्षेत्रातील कामगिरीवर लोकमान्यतेची मोहोर उमटविण्यात आली आहे. त्यांच्या प्रशासकीय कौशल्यांचा आणि कार्यक्षमतेचा लाभ सिडको महामंडळालाही होऊन ‘सिडको'चा लौकिक वृध्दींगत होईल, अशा शब्दात सिडको एम्पॉईज युनियन आणि सिडको प्रकल्पग्रस्त कर्मचारी वेल्फेअर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी राजेश पाटील यांचे अभिनंदन करुन त्यांना
शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी ‘सिडको एम्प्लॉईज युनियन'चे अध्यक्ष विनोद पाटील, सरचिटणीस तथा ‘सिडको प्रकल्पग्रस्त कर्मचारी वेल्फेअर असोसिएशन'चे अध्यक्ष जे. टी. पाटील आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

सिने अभिनेत्री मलायका अरोरा उद्‌घाटन सोहळ्याचे मुख्य आकर्षण