शहराच्या शाश्वत विकासासाठी ‘केडीएमसी'चे ७ कलमी मुद्दे -आयुक्त गोयल
महागृहनिर्माण योजनांमधील घरांच्या हप्त्यापोटी शिल्लक रक्कम भरणा करण्याचे आवाहन
‘सिडको'तर्फे घरांचा हप्ता न भरलेल्या अर्जदारांसाठी अभय योजना जाहीर
नवी मुंबई ः ‘सिडको'ने महागृहनिर्माण योजना अंतर्गत सन २०१८ ते २०२२ मध्ये विविध प्रवर्गांकरिता काढलेल्या सोडती मधील ज्या विजयी अर्जदारांनी एकही हप्ता भरला नाही अथवा एकूण हप्त्यापैकी काही हप्त्यांचा भरणा केलेलाआहे, अशा अर्जदारांकडून वारंवार मुदतवाढीसाठी विनंती करण्यात येत आहे. त्यामुळे ‘सिडको संचालक मंडळ'ने या बाबींचा सहानुभूतीपूर्वक विचार करुन सदर अर्जदारांना अंतिम संधी म्हणून येत्या ३० एप्रिल २०२३ पर्यंत हप्त्यापोटी शिल्लक रक्कमेचा भरणा करण्यासाठी विलंब शुल्कात सवलत देण्याबाबतची अभय योजना आणण्यास मान्यता दिलेली आहे. नमूद सोडतीमधील सदनिका आर्थिकदृष्टया दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या. यामध्ये नवी मुंबईतील तळोजा, खारघर, कळंबोली, घणसोली, द्रोणागिरी या ५ नोडस् मध्ये गृहनिर्माण योजना साकारण्यात आल्या आहेत. सोडतीमध्ये कागदपत्रांच्या छाननीअंती पात्र ठरलेल्या अर्जदारांना वाटपपत्रे देण्यात आलेली असून वाटपपत्रामध्ये अर्जदारांना सदनिकेपोटी रक्कमेचा भरणा करण्यासाठी वेळापत्रक देण्यात आले होते. त्यानुसार काही अर्जदारांनी एकूण हप्त्यापैकी काही हप्त्यांचा भरणा केलेला आहे आणि काही अर्जदारांनी आजतागायात एकाही हप्त्याचा भरणा केला नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे असे अर्जदार कायद्यानुसार वाटपपत्र रद्द करण्यास पात्र ठरतात. त्यानुसार ९ सप्टेंबर २०१९ ते २१ फेब्रुवारी २०२२ या दरम्यान ज्या अर्जदारांना वाटपपत्रे देण्यात आली आहेत, त्यापैकी ज्या थकबाकीदार (िील्त्ूी) अर्जदारांनी शिल्लक रक्कमेचा भरणा करण्यास यापुर्वी मुदतवाढ देऊनही त्यांनी शिल्लक रक्कमेचा भरणा केलेला नाही, अशा अर्जदारांकरिता अभय योजना (ींस्होूब् एम्पस) राबविण्याचे महामंडळाने ठरविले आहे.
या योजनेनुसार आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांतील जे थकीत अर्जदार ३० एप्रिल २०२३ पर्यंत संपूर्ण रक्कमेचा भरणा करतील अशा अर्जदारांचे १००ज्ञ्र् विलंब शुल्क माफ करण्यात येईल. तर अल्प उत्पन्न गटातील जे अर्जदार ३० एप्रिल २०२३ पर्यंत संपूर्ण रक्कमेचा भरणा करतील अशा अर्जदारांचे एकूण विलंबशुल्काच्या २५ज्ञ्र् एवढा विलंब शुल्क माफ करण्यात येईल. तसेच ३० एप्रिल पर्यंत म्हणजेच वाढीव मुदतीत एकही हप्ते भरणा न केलेल्या अर्जदारांचे वाटपपत्र तात्काळ रद्द करण्यात येईल. ज्या आर्थिकदृष्टया दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गटातील अर्जदारांनी ३० एप्रिल पर्यंत कमीत कमी एका हप्त्याचा भरणा केला असेल, अशा अर्जदारांना वाढीव ३० दिवसांची म्हणजेच ३१ मे २०२३ पर्यंत विलंब शुल्कासह उर्वरित हप्त्यांचा भरणा करण्यास मुदतवाढ देण्यात येणार आहे. ३१ मे २०२३ पर्यंत रक्कमेचा (मुळ रक्कम, विलंब शुल्क) भरणा न करणाऱ्या थकबाकीदार (िील्त्ूाी) अर्जदारांचे वाटपपत्र तात्काळ रद्द करण्यात येतील. तसेच ज्या अर्जदारांचे वाटपपत्र २१ फेब्रुवारी २०२२ नंतर वितरीत झालेले आहेत, अशा अर्जदारांना विलंबशुल्क माफी योजना (ींस्होूब् एम्पस) लागू होणार नाही. परंतु, अशा अर्जदारांना नवी मुंबई जमीन विनियोग (सुधारित) नियमावली, २००८ (ऱ्श्थ्(ीं)R २००८) मधील तरतुदीनुसार थकीत रक्कमेचा भरणा करण्यासाठी शेवटच्या हप्त्याच्या तारखेपासून सहा महिन्यापर्यंतची मुदतवाढ देण्यात येणार आहे.
याद्वारे २०१८-१९ मधील महागृहनिर्माण योजना मधील थकबाकीदार (िील्त्ूी) अर्जदारांनी सुचित करण्यात येते की, ‘सिडको'च्या अधिकृत www.cidco.maharashtra.gov.in संकेतस्थळावर भेट देऊन आपल्या शिल्लक हप्त्यापोटी संपूर्ण रक्कमेचा भरणा विहीत मुदतीत करावा आणि सदर ‘अभय योजना'चा सर्व अर्जदारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन ‘सिडको'तर्फे करण्यात आले आहे.