शहराच्या शाश्वत विकासासाठी ‘केडीएमसी'चे ७ कलमी मुद्दे -आयुक्त गोयल
महापालिका करणार झाडांची नाहक कत्तल
जितेंद्र कांबळी यांचा आंदोलनाचा इशारा
वाशी ः वाशी सेक्टर-१ मधील एकेरी वाहतूक रस्त्यावर झाडांची कत्तल करण्याचा घाट नवी मुंबई महापालिका अधिकाऱ्यांनी घातला आहे. विशेष म्हणजे स्थानिक असोसिएशन मधील रस्त्यांची कत्तल केली जात असल्याने वृक्ष प्रेमी संतप्त झाले आहेत.
वाशी सेवटर-१७ मधील अभ्युदय बँक ते वाशी पोलीस ठाणेकडे जाणारा रस्ता एकेरी वाहतूक असणारा आहे. या रस्त्यावर शिधावाटप कार्यालय, सिडको वसाहत अधिकारी, वित्तीय बँक, नागरी आरोग्य केंद्र आहे. विविध शासकीय कार्यालय असलेल्या वाशी सेक्टर-१ मधील रस्त्यावर एकेरी वाहतूक व्यवस्था राबवली जाते. या रस्त्याच्या विकास कामासाठी अंतर्गत वसाहती मधील कुंपणालगत असणाऱ्या झाडांवर कुऱ्हाड चालवली जाणार आहे.याठिकाणी सुमारे शेकडो पुरातन झाडे असून या झाडांपैकी २८ झाडांवर कुऱ्हाड चालवली जाणार आहे.१९७६ सालापासून या झाडांची लागवड केली असल्याची माहिती स्थानिक नागरिक तथा माजी नगरसेवक जितेंद्र कांबळी यांनी दिली.
वाशी सेक्टर-१ मधील २८ झाडे तोडण्यास माजी नगरसेवक जितेंद्र कांबळी यांनी तीव्र विरोध केला असून, या विरोधात जनआंदोलन उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. रहिवाशी वसाहतीच्या असोसिएशन कुंपणालगत असणारी झाडे तोडण्यासाठी नवी मुंबई महापालिका अधिकारी तत्पर असल्याने स्थानिक नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत. विशेष म्हणजे या ठिकाणी विविध प्रजातीच्या वृक्षसंपदेमुळे मिनी कोकण म्हणून सदर परिसर ओळखला जातो.याच रस्त्यावर असणाऱ्या शैक्षणिक संस्थेची भिंत याच रस्त्यालगत असताना नेमका विकास कोणत्या आधारावर केला जात आहे?, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.