‘जागर' व्याख्यानमालेत ‘सर्वव्यापी आंबेडकर'द्वारे खांडेकर यांचा नवी मुंबईकरांशी संवाद

जीवनातील प्रत्येक क्षेत्रात बाबासाहेबांच्या विचारांचा स्पर्श - राजीव खांडेकर

नवी मुंबई ः महापुरुषांच्या स्मारकाबद्दल त्या काळात बाबासाहेबांच्या मनात असलेल्या संकल्पना अगदी यथार्थपणे नवी मुंबई महापालिकेने उभारलेल्या बाबासाहेबांच्या स्मारकात साकारलेल्या असून बाबासाहेबांना अभिप्रेत
असलेले समृध्द ग्रंथालय या स्मारकातील सर्वात महत्वाची गोष्ट आहे. त्या अनुषंगाने सर्वच सुविधांच्या बाबत देशभरातील विविध स्मारकांपेक्षा ऐरोली मध्ये अत्यंत वेगळे आणि सर्वोत्तम स्मारक पाहून भारावून गेलो, स्तिमित
झालो, अशा शब्दात ‘एबीपी न्यूज-एबीपी माझा'चे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

दरम्यान, आपण डॉ. आंबेडकर स्मारकाला भेट देतो, तेव्हा येथील एक एक गोष्ट पाहून बाबासाहेबांच्या आभाळाएवढ्या व्यक्तिमत्वातील विविध पैलुंचा प्रत्यय येतो. त्यामुळे प्रत्येकाने याठिकाणी आवर्जून भेट देऊन प्रेरणा
घ्ोऊन इतरांनाही भेट देण्यास सांगावे, असे आवाहनही राजीव खांडेकर यांनी केले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

मालमत्ता कर विभागापाठोपाठ नगररचना विभागाची कर वसुलीत आघाडी