पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांविरुध्द महापालिका प्रशासनाने कारवाईचा बडगा

पाण्याचा अपव्यय ; ९७१ व्यवतींवर दंडात्मक कारवाई

वाशी ः मोरबे धरणात मुबलक पाणीसाठा असला तरी पाणी जपून वापरण्याचे आवाहन नवी मुंबई महापालिका नेहमीच करत आली आहे. मात्र, पाणी जपून वापरण्याचे आवाहन करुन देखील काही नागरिक पाण्याचा अपव्यय करीत आहेत. मात्र, पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांविरुध्द महापालिका प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला असून, गेल्या महिन्याभरात पाण्याचा अतिरिक्त वापर करणाऱ्या ९७१ व्यवतींवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

    नवी मुंबई शहराला मोरबे धरणातून पाणीपुरवठा होतो. मात्र, यंदा मोरबे धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस न पडल्याने मोरबे धरण अवघे ९५ % भरले होते. परंतु, आता दिवसेंदिवस पाण्याची पातळी कमी होत असून, पाण्याचा वापर वाढत आहे. धरणात ४८ % पाणीसाठा उपलब्ध असून, १५ ऑगस्ट पर्यंत पुरेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. तसेच जून-जुलै महिन्याच्या पावसावर पाण्याचे गणित अवलंबून आहे. त्यामुळे भविष्यात पाणी कपातीचे संकट येऊ नये म्हणून आधीच पाणी वाचविण्याचे आवाहन करण्यात येत आहे. पाणी जपून वापरण्यात बाबत नवी मुंबई महापालिकेने नोटीस काढली होती. मात्र, या नोटीस नंतर देखील नवी मुंबई शहरात नागरिकांकडून पाण्याचा अतिरिक्त वापर करण्यात येत आहे. पिण्याचे पाणी इतरत्र अनावश्यक ठिकाणी वापरण्यात येत आहे. गरज नसताना देखील नळ सुरु ठेवणे, पिण्याच्या पाण्याचा वापर गाडी धुण्यासाठी करणे, पाण्याची टाकी भरुन वाहने, अशा प्रकारे पाण्याचा अयोग्य वापर करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. गेल्या महिन्याभरात ९७१ जणांवर कारवाई करुन दंडात्मक वसुली करण्यात आली, तर काहींची नळ जोडणी खंडित करुन वीजबिलाच्या दुप्पट शुल्क आकारुन कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती महापालिकेने दिली आहे.

यंदा मोरबे धरण पूर्ण भरले नसल्याने आताच्या स्थितीला पाणी बचत करणे गरजेचे आहे. त्यामुळे नवी मुंबई महापालिकेकडून वारंवार पाणी बचत करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मात्र, तरी देखील काही नागरिकांकडून पाण्याचा अयोग्य वापर करण्यात येत असून, अशा ९७१ व्यवतींवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. - संजय देसाई, शहर अभियंता - नवी मुंबई महापालिका.
 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘जागर' व्याख्यानमालेत ‘सर्वव्यापी आंबेडकर'द्वारे खांडेकर यांचा नवी मुंबईकरांशी संवाद