नवी मुंबईमध्ये ऐरोली आणि बेलापूर विधानसभा मतदारसंघामध्ये स्वातंत्र्यवीर ‘सावरकर गौरव यात्रा'

नवी मुंबई सावरकरमय !

नवी मुंबई ः  स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वारंवार अपमान करणाऱ्या ‘काँग्रेस'चा निषेध करण्यासाठी आणि सावरकरांचे कार्य पुन्हा एकदा जनतेपर्यंत आणि युवा पिढी पर्यंत पोहोचवण्यासाठी नवी मुंबईमध्ये ऐरोली
आणि बेलापूर विधानसभा मतदारसंघामध्ये स्वातंत्र्यवीर ‘सावरकर गौरव यात्रा' काढण्यात आली. बेलापूर मधील ‘सावरकर गौरव यात्रा'चे आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी तर ऐरोली तील ‘सावरकर गौरव यात्रा'चे आमदार गणेश
नाईक यांनी नेतृत्व केले. या गौरव यात्रेमध्ये हजारो सावरकरप्रेमी नागरिकांनी सहभाग घ्ोतला.

 ‘बेलापूर'मधील ‘सावरकर गौरव यात्रा' आ.सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या नेतृत्वात किल्ले गांवठाण ते वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यंत काढण्यात आली. यामध्ये ‘बाळासाहेबांची शिवसेना'चे उपनेते विजय नाहटा,
माजी महापौर जयवंत सुतार, संपर्कप्रमुख किशोर पाटकर, ‘भाजपा'चे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, जिल्हा महामंत्री डॉ. राजेश पाटील, विजय घाटे, ‘बाळासाहेबांची शिवसेना'च्या महिला जिल्हाप्रमुख सौ. सरोज पाटील,
उपजिल्हाप्रमुख रोहिदास पाटील, माजी नगरसेवक डॉ. जयाजी नाथ, अशोक गुरखे, दीपक पवार, सुनिल पाटील, सुरेश शेट्टी, माजी नगरसेविका शिल्पा कांबळी यांच्यासह इतर पदाधिकारी-कार्यकर्ते, महिला-ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते. यावेळी शेकडो बाईकस्वार घोषणा देत तर महिलावर्ग नाचत-गात ‘गौरव यात्रा'मध्ये सहभागी झाला होता. तसेच काही नागरिक विविध प्रकारच्या वेशभूषेत आले होते.

ऐरोली मधील ‘सावरकर गौरव यात्रा'मध्ये आमदार गणेश नाईक यांच्यासह माजी खासदार  संजीव नाईक, माजी आमदार संदीप नाईक, माजी महापौर जयवंत सुतार, सागर नाईक, माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत, ‘भाजपा'चे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, सावरकर विचार मंच नवी मुंबईचे संतोष कानडे, आदिंसह इतर मान्यवर सहभागी झाले होते. त्यामुळे संपूर्ण नवी मुंबई सावकरमय झाली होती.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

शैक्षणिक शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यास प्रारंभ - महापालिका आयुवत राजेश नार्वेकर