सानपाडा सोनखार येथील क्रीडाप्रेमींसाठी पर्वणी !

उड्डाणपुलाखालील मोकळ्या, पडीक जागेत ‘ॲम्पी स्पोर्टस्‌ कॉम्प्लेक्स'

नवी मुंबई ः सानपाडा येथील मोकळ्या, पडीक जागेचा नियोजनबध्द आणि सेवापूर्ती भावनेने वापर करुन नवी मुंबई महापालिकेच्या अभियांत्रिकी विभागाने स्थानिक लोकप्रतिनिधींच्या संकल्पनेतून उभारलेल्या ‘ॲम्पी स्पोर्टस्‌ कॉम्प्लेक्स'चा क्रीडाप्रेमी जेष्ठ नागरिक, महिला आणि बच्चे कंपनी मनमुराद आनंद घ्ोत असून ती सानपाडावासियांसाठी एक पर्वणीच आहे.

सानपाडा येथील बहुचर्चित पामबीच विभाग हाय फाय एरिया म्हणून सुपरिचित आहे. सानपाडा पूर्वेला असणाऱ्या या विभागात एकूण ९ सेक्टर्स आहेत. या परिसरात केवळ एकच सार्वजनिक उद्यान आणि एक छोटेखानी मैदान असून ३० हजारांहुन अधिक लोकसंख्या असणाऱ्या ते अपुरे आहे. येथील नागरिकांना क्रीडा विषयक भेडसावणारी जागेची कमतरता लक्षात घेता, सानपाडा पामबीच विभाग आणि सानपाडा नोडस्‌ यांना जोडणाऱ्या ओव्हरब्रिज खालील मोकळ्या आणि पडीक जमिनीचा योग्य वापर होऊन क्रीडाप्रेमींना खेळता यावे अशी स्थानिकांची गरज लक्षात घेऊन माजी नगरसेविका सौ. वैजयंती दशरथ भगत यांनी ‘ॲम्पी स्पोर्टस्‌ कॉम्प्लेक्स' निर्माण व्हावे यासाठी नवी मुंबई महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला.

सौ. वैजयंती भगत यांच्या प्रयत्नांना यश येऊन सदर ठिकाणी सुसज्ज आणि नियोजनपूर्व ‘ॲम्पी स्पोर्टस्‌ कॉम्प्लेक्स' २३ जानेवारी २०२३ पासून सुरु झाले आहे. माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत यांच्या संकल्पनेतून तसेच युवा नेते निशांत भगत यांच्या निरीक्षणाखाली उड्डाणपुलाखालील जागेत सुसज्ज बास्केटबॉल, हॉलीबॉल, बॅडमिंटन, बॉक्स क्रिकेट, स्केटिंग ट्रॅक, योगा असे तंदुरुस्त आणि निरोगी शरीर राखण्यासाठी उपयुक्त असणारे खेळ खेळले जात आहे. त्यामुळे सानपाडा येथील क्रीडाप्रेमींसाठी एक पर्वणीच आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नवी मुंबईमध्ये ऐरोली आणि बेलापूर विधानसभा मतदारसंघामध्ये स्वातंत्र्यवीर ‘सावरकर गौरव यात्रा'