खारघर येथील ए.सी.पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाचा रिदम्स-2023 हा सांस्कृतिक कार्यक्रम जल्लोषात साजरा

ए.सी.पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त सहभाग  

नवी मुंबई : खारघर येथील ए.सी.पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाचा रिदम्स-2023 हा सांस्कृतिक कार्यक्रम जल्लोषात साजरा झाला. 28 आणि 29 मार्च दरम्यान आयोजित या कला आणि संगीत सोहळ्यात स्वरसंध्या, गायन स्पर्धा, नृत्य स्पर्धा, फॅशन शो, अंताक्षरी, फ्रेशर्स, टेल ट्विस्टर, डुडलिंग, स्टोरी टेलिंग, पोएट्री रेसिटेशन, मेंहदी, रांगोळी, स्केचिंग, ड्रामा अशा विविध स्पर्धात विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवला.  

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.व्ही.एन.पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या रिदम्स-2023 या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून खारघर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजीव शेजवाळ उपस्थित होते. यावेळी राजीव शेजवळ यांनी विद्यार्थ्यांना समाजमाध्यमांचे फायदे व नुकसान याबाबत माहिती देऊन विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली. तसेच वाहतूकीचे सर्व नियम पाळण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले. प्रा.जयश्री मुंडकर (जाधव), उपप्रमुख प्रा.डॉ.जयप्रभा तेरदाळे आदींनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमामध्ये गुणवंत व यशस्वी विद्यार्थ्यांचा बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला.  

दरम्यान, 20 मार्च ते 27 मार्च दरम्यान महाविद्यालयाचे क्रिडा प्रमुख प्रा.हेमंत बडोदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कुरुक्षेत्र या क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या क्रिडा स्पर्धेत इतर महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी देखील सहभाग घेतला होता. या स्पर्धेत महाविद्यालयाच्या इलेक्ट्रिकल विभागाने पुन्हा एकदा कुरुक्षेत्र ट्रॉफी पटकविली. या स्पर्धांचे बक्षिस वितरण व विजेत्यंचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पार पडला.  

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

सानपाडा सोनखार येथील क्रीडाप्रेमींसाठी पर्वणी !