विद्यार्थी, पालक इतर कर्मचाऱ्यांना येणाऱ्या जात वैधता प्रमाणपत्र अडचणींचे निराकरण करण्यासाठी ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन

जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीकरिता ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन

नवी मुंबई :-  जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी करताना विद्यार्थी, पालक तसेच महाविद्यातील कर्मचाऱ्यांना येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती ठाणे यांच्यावतीने  दिनांक 03 एप्रिल 2023 रोजी दुपारी 12.30 ते 3.00 या कालावधीत विद्यार्थी, पालक आणि  संबंधित महाविद्यालयातील प्राचार्य,  कर्मचारी तसेच समान संधी केंद्र (equal opportunity center) कर्मचारी यांच्याकरिता जात प्रमाणपत्र  पडताळणी कार्यपद्धती बाबत Google Meet द्वारे ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

या ऑनलाईन कार्यशाळेस Google Meet joining info Video Call link : https://meet.google.com/djf-fzqz-mph  या लिंकद्वारे उपस्थित राहता येईल. मागासवर्गीय विद्यार्थी, पालक आणि  संबंधित महाविद्यालयातील प्राचार्य, कर्मचारी व महाविद्यालयातील समान संधी केंद्र (equal opportunity center)  कर्मचारी यांनी  मोठ्या संख्येने या ऑनलाईन कार्यशाळेत उपस्थित राहून या कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन ठाणे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या  संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव श्रीम.उज्वला सपकाळे  यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

मनोऱ्याची रचना पक्षी पाहणाऱ्या लोकांसाठी नव्हे तर सुरक्षा रक्षकांसाठी ?