शहराच्या शाश्वत विकासासाठी ‘केडीएमसी'चे ७ कलमी मुद्दे -आयुक्त गोयल
६१ व्या महाराष्ट्र राज्य हिंदी नाट्य स्पर्धेत ६१ नाटकांचे सादरीकरण
हिंदी राज्यनाट्य स्पर्धेत नवी मुंबईतील पहचान के नए पंख प्रथम
नवी मुंबई ः महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित ६१ व्या महाराष्ट्र राज्य हिंदी नाट्य स्पर्धेत शिव रणभूमी प्रशांत प्रतिष्ठान सेवा संस्था, नवी मुंबई निर्मित हिंदी नाटक ‘पहचान के नए पंख' तब्बल ६१ नाटकांमधून अव्वल ठरले आहे. ‘शिव रणभूमी प्रशांत प्रतिष्ठान'ने मिळविलेले यश नवी मुंबईतील कला विश्वासाठी अभिमानास्पद आहे, असे या संस्थेचे सर्वेसर्वा प्रशांत निगडे यांनी सांगितले. सर्वोत्कृष्ट नाट्य निर्मिती-प्रथम, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन प्रथम-प्रशांत निगडे, सर्वोत्कृष्ट अभिनेता-प्रशांत निगडे, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- विरीशा नाईक असे महत्त्वपूर्ण चार पुरस्कार ‘शिव रणभूमी प्रशांत प्रतिष्ठान'ला जाहीर झाले. ‘पहचान के नए पंख' नाटक फासे पारधी समाजातील वास्तवावर भाष्य करते. लेखक, दिग्दर्शक, निर्माता, अभिनेता म्हणून प्रशांत निगडे यांनी सर्व भूमिका यशस्वीरित्या पेलवल्या आहेत. विरीशा नाईक, श्रध्दा शितोळे या सहकलाकारांनी देखील आपल्या भूमिका चोख पार पाडल्या आहेत. यावर्षी दुग्ध शर्करा योग जुळून येत ‘शिव रणभूमी प्रशांत प्रतिष्ठान'चे तळमळ एका अडगळीची बालनाट्याने महाराष्ट्र शासन, सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित १९ व्या बालनाट्य स्पर्धेत नवी मुंबई केंद्रातून प्रथम येतानाच महाराष्ट्रातून देखील द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त केला आहे. तसेच नवी मुंबई महापालिका राज्यस्तरीय करंडक स्पर्धेत हेच बालनाट्य प्रथम पुरस्काराने विजयी झाले आहे. नवी मुंबई महापालिका आयोजित राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत ‘आय. एम. पुंगळ्या शारुक्या आगीमहुळ' या एकांकिकेला नवी मुंबई केंद्रातून प्रथम पुरस्कार प्राप्त झाला आहे.
एकंदरीतच ‘शिव रणभूमी प्रशांत प्रतिष्ठान' नाटय संस्था गेली अनेक वर्षे सातत्याने यशस्वीरित्या नाट्य निर्मिती करत असून अनेक पुरस्कारांची मानकरी ठरत संस्था नवी मुंबईचा डंका महाराष्ट्रभर वाजवत आली आहे. शिव
रणभूमी प्रशांत प्रतिष्ठान आणि संस्थेतील कलाकार कलाक्षेत्रात उत्तुंग यश प्राप्त करीत आहे.