दिलेल्या ५७५ कोटींच्या उद्दिष्टापेक्षा महापालिकाकडून अधिक कर वसूल -आयुवत नार्वेकर

६०६ कोटींची विक्रमी मालमत्ताकर वसुली

नवी मुंबई ः महापालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत असलेल्या मालमत्ताकर वसुलीकडे आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष लक्ष देण्यात आले होते. या अनुषंगाने मालमत्ताकर विभागाच्या प्रमुख अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांनी नियोजनबध्द काम करीत करवसुलीच्या दृष्टीने उचललेल्या सुयोग्य निर्णयांमुळे विद्यमान आर्थिक वर्ष संपण्याच्या १ दिवस आधीच म्हणजेच ३० मार्च रोजी अर्थसंकल्प २०२२-२३ मध्ये दिलेले ५७५ कोटी रुपयांचे उद्दिष्ट पार करीत ६०६ कोटी ६ हजार रुपये इतकी रक्कम मालमत्ताकरापोटी वसूल केलेली आहे.

यावर्षी पहिल्यांदाच मालमत्ताकराची ६०० कोटीपेक्षा अधिक विक्रमी वसुली झालेली असून सदर निधी महापालिकेच्या वतीने नागरी सुविधा पूर्ततेसाठी खर्च केला जात असल्याने नागरिकांच्या सहकार्याबद्दल आयुक्त राजेश नार्वेकर यांनी नवी मुंबईकर नागरिकांचे आभार मानले आहेत.

चालू आर्थिक वर्षाचा अखेरचा दिवस आज ३१ मार्च असल्याने आदल्या दिवशी ३० मार्च रोजी रामनवमीची सार्वजनिक सुट्टी असूनही नागरिकांना करभरणा करणे सोयीचे जावे म्हणून महापालिकेची सर्व कार्यालये सुरु ठेवण्यात आली होती. त्याअनुषंगाने नागरिकांनी आपला मालमत्ताकर विहित वेळेत भरावा यादृष्टीने विविध माध्यमांतून आवाहन करण्यात आले होते. कोरोना कालावधीत नागरिकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले होते. याचा साकल्याने विचार करुन पुन्हा एकवार थकीत मालमत्ताकराच्या दंडात्मक रक्कमेवर ७५ टक्के सूट देणारी अभय योजना १५५ फेब्रुवारी ते १५ मार्च या कालावधीत जाहीर करण्यात आली होती. त्यानंतरही १६ ते ३१ मार्चपर्यंत ५० टक्के सूट देण्यात आलेली होती. नागरिकांनी ‘अभय योजना'चाही मोठ्या प्रमाणावर लाभ घ्ोतल्याचे चित्र पहायला मिळाले. एकूण १२०६८ व्यक्ती, संस्थांनी ‘अभय योजना'चा लाभ घ्ोत १०९.३७ कोटी इतकी रक्कम जमा केली.

 ‘अभय योजना'ची आवाहनपत्रे संबंधितांना महापालिकेमार्फत देण्यात आली होती. तसेच सोशल माध्यमांद्वारे, वर्तमानपत्रांद्वारे, हस्तपत्रके वितरणाद्वारे तसेच ठिकठिकाणी प्रदर्शित केलेल्या होर्डींगद्वारे नागरिकांना आवाहन करण्यात आले. रिक्षातून ध्वनीक्षेपकाद्वारेही नागरिकांना गल्लोगल्ली आवाहन करण्यात आले. अशा विविध माध्यमांचा प्रभावी वापर करीत नागरिकांपर्यंत पोहोचल्याने नागरिकांचा उत्साही प्रतिसाद लाभला. याशिवाय अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांनी आयुक्तांच्या मार्गदर्शनानुसार विभागनिहाय नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांना वसूलीचे लक्ष्य आखून देऊन त्यांच्या कामावर बारीक लक्ष ठेवण्यात आले. अधिकारी-कर्मचाऱ्यांना वसुली कामात येणाऱ्या अडचणी प्राधान्याने दूर करण्यावर विशेष भर दिला. मालमत्ताकराविषयी नागरिकांच्या असलेल्या हरकती-सूचना याकडे लक्ष देत वेळोवेळी सुनावणी घ्ोऊन नागरिकांच्या अडचणी दूर करण्याकडे आणि यातून जास्तीत जास्त वसूली होईल याकडे प्रामुख्याने लक्ष दिले. याचा परिपाक म्हणजे आत्तापर्यंतची सर्वाधिक मालमत्ताकर वसुली झालेली आहे.

सन २०१९-२० या कालावधीत ५५८ कोटी असलेली मालमत्ताकर वसूली, सन २०२०-२१ मध्ये ५३४ कोटी इतकी होती. सन २०२१-२२ या मागील वर्षी ५२६ कोटी इतकी मालमत्ताकर वसूली होती, ती यावर्षी सन २०२२-२३ मध्ये आर्थिक वर्ष संपण्यास दीड दिवस बाकी असतानाच ३० मार्च रोजी दुपारपर्यंत ६०६.०६ कोटी रुपये इतकी झालेली आहे. या आर्थिक वर्षात नागरिकांना मालमत्ताकर भरण्याचे आवाहन करण्यासोबत त्यांच्या अडचणी जाणून घ्ोत, त्यांची सोडवणूक करण्याप्रमाणेच मालमत्ताकर थकबाकीदारांना नियमानुसार ७ दिवसांच्या आणि त्यानंतर ४८ तासांच्या नोटीसा बजाविण्यात आलेल्या होत्या. १० लाखापेक्षा अधिक थकबाकी असणाऱ्या १५० हून अधिक थकबाकीदारांच्या मालमत्तांची अटकावणी करण्यात आलेली होती. त्यापैकी १०० हुन अधिक थकबाकीदारांनी लगेचच आपल्या थकबाकीचा भरणाही केला.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

६१ व्या महाराष्ट्र राज्य हिंदी नाट्य स्पर्धेत ६१ नाटकांचे सादरीकरण