शहराच्या शाश्वत विकासासाठी ‘केडीएमसी'चे ७ कलमी मुद्दे -आयुक्त गोयल
हार्टफुलनेस वेलनेस संस्था आणि महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने महिला स्वच्छ्ता कर्मचाऱ्यांचा सन्मान
आय लीफ बँक्वेट्सच्या स्त्री ज्योती पुरस्काराचे दिमाखात वितरण
नवी मुंबई : नवी मुंबईतील आय लीफ बँक्वेट्सच्या वतीने स्त्री ज्योती पुरस्काराचे बुधवारी दिमाखात वितरण करण्यात आले. हार्टफुलनेस वेलनेस संस्था आणि नवी मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सोहळ्यात महापालिकेच्या 30 हून अधिक आरोग्य आणि स्वच्छता महिला कर्मचाऱ्यांचा ट्रॉफी, साडी आणि प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. महापालिकेचे उपायुक्त सोमनाथ पोटरे उपायुक्त श्रीराम पवार आणि सहाय्यक आयुक्त मिताली संचेती यांच्या हस्ते महिला स्वच्छ्ता कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
आय लीफ बँक्वेट्सच्या वतीने नियमित सामाजिक उपक्रम राबविले जात असतात. त्याचाच एक भाग म्हणून आय लीफ बँक्वेट्सच्या वतीने स्त्री ज्योती पुरस्काराच्या माध्यमातून महिला कामगार आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांना पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात येत आहे. याहीवर्षी आय लीफ बँक्वेट्समध्ये महापालिकेच्या 30 हून अधिक आरोग्य आणि स्वच्छता महिला कर्मचाऱ्यांचा ट्रॉफी, साडी आणि प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. सलग दुसर्या वर्षी स्त्री ज्योती पुरस्कारांचे आयोजन करताना आनंद होत असल्याची भावना आय लीफ बँक्वेट्सचे व्यवस्थापकीय संचालक प्रतीश आंबेकर यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केली. पिल्लई ग्रुप ऑफ एज्युकेशनच्या डायरेक्टर आणि हार्टफुलनेसच्या पीआर डायरेक्टर डॉ. निवेदिता श्रेयांस यांनी देखील महापालिका स्वच्छता महिला कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव केला. यावेळी पिल्लई ग्रुप ऑफ एज्युकेशनच्या विद्यार्थ्यांनी सामाजिक विषयावर प्रबोधनात्मक नाटक व नृत्याचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.