अशोक पालवे यांना अभिनयाचे प्रथम पारितोषिक

मराठी साहित्य संस्कृती व कला मंडळाचे ‘चुभन' नाटक राज्य स्पर्धेत दुसरे

नवी मुंबई : ६१ व्या महाराष्ट्र राज्य हिंदी नाट्य स्पर्धेच्या मुंबई केंद्राच्या अंतिम फेरीत वाशीच्या मराठी साहित्य संस्कृती व कला मंडळाने सादर केलेल्या वासंती भगत लिखित ‘चुभन' या नाटकासाठी अभिनयाचे प्रथम पारितोषिक वाशीच्या अशोक पालवे यांना जाहिर झाले आहे. या नाटकाने सदर स्पर्धेत सहा पारितोषिकांची कमाई करताना नाटकासाठीचे द्वितीय पारितोषिकही पटकावले आहे.

लेखनाकरिता वासंती भगत यांना ‘चुभन' साठी पारितोषिक जाहिर झाले आहे. तर दिग्दर्शनाचे तृतीय पारितोषिक अशोक पालवे यांना, प्रकाशयोजनेसाठीचे प्रथम पारितोषिक श्याम चव्हाण यांना; तर नेपथ्यासाठी निरंजन घरत यांना घोषित झाले आहे. ‘चुभन' या नाटकात अशोक पालवे यांच्या सोबत महेंद्र तांडेल आणि दिपाली चौगुले यांनीही भूमिका केल्या आहेत.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

आ.मंदाताई म्हात्रे करणार ‘गौरव यात्रा'चे नेतृत्व