‘चैत्र नवरात्रोत्सव-२०२३'मध्ये आदेश बांदेकर यांचा भोंडला आणि मराठमोळा दांडियाचे सादरीकरण

‘चैत्र नवरात्रौत्सव'मध्ये रंगला आदेश बांदेकर यांचा भोंडला

ठाणे ः ‘ठाणे'चे खासदार राजन विचारे यांनी ‘आनंद चॅरिटेबल ट्रस्ट'च्या वतीने आयोजित केलेल्या जांभळी नाका येथील ‘चैत्र नवरात्रोत्सव-२०२३'मध्ये भक्ती-कला महोत्सवाच्या सातव्या दिवशी आदेश बांदेकर यांचा भोंडला आणि मराठमोळा दांडियाचे सादरीकरण झाले. या ‘चैत्र नवरात्रौत्सव'ला माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या पत्नी सौ. रश्मी उध्दव ठाकरे यांनी देवीचे दर्शन घेतानाच खणा-नारळाने ओटी भरुन देवीची आरती केली. यावेळी त्यांच्या सोबत मातोश्री पाटणकर या उपस्थित होत्या. महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होऊदे...जनतेला सुखा समाधानाचे दिवस येऊ दे... अशी प्रार्थना देवीकडे केल्याचे सौ. रश्मी ठाकरे यांनी सांगितले.

तर ‘भोंडला'मध्ये आदेश भाऊजींचा पैठणीचा खेळ रंगला. त्यामध्ये अनेक महिलांनी नृत्य करन उत्तेजनार्थ पारितोषिके मिळवली. तर कार्यक्रमातील लकी ड्रॉ ची कुपन काढून त्यातील बक्षिसे सौ. रश्मी ठाकरे यांच्या हस्ते देण्यात आली.
सदर ‘चैत्र नवरात्रोत्सव'ला ‘मुंबई'चे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, एबीपी न्यूजचे ब्युरो चीफ जितेंद्र दिक्षीत यांनीही उपस्थित राहून देवीची पुजा-अर्चना केली.

याप्रसंगी खासदार राजन विचारे, जिल्हाप्रमुख केदार दिघे, ठाणे लोकसभा संपर्क प्रमुख मधुकर देशमुख, माजी नगरसेवक मंदार विचारे, महिला उपजिल्हा प्रमुख रेखा खोपकर, आकांक्षा राणे, नवी मुंबई जिल्हा संघटक रंजना शिंत्रे, ठाणे उपजिल्हा प्रमुख संपदा पांचाळ, विधानसभा क्षेत्र प्रमुख प्रमिला भांगे, ठाणे उपशहर संघटक राजेश्री सुर्वे, माजी नगरसेविका नंदिनी विचारे, रागिणी बैरीशेट्टी, अंकिता पाटील तसेच मेघा विचारे, पियाली आलेगावकर, युवासेना सहसचिव धनश्री राजन विचारे तसेच ठाणे, नवी मुंबई आणि मिरा-भाईंदर येथील शिवसेना पदाधिकारी, महिला आघाडी, युवती सेना-युवा सेनाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

बांधकाम व्यावसायिक सावजीभाई मंजेरी यांच्या हत्या प्रकरणात सहभागी असलेल्या मुख्य आराेपी अटक