क्रेडाई-बीएएनएम तर्फे २१ व्या मेगा प्रॉपर्टी प्रदर्शनाचे आयोजन

७ ते १० एप्रिल दरम्यान वाशीत प्रॉपटी प्रदर्शन 

नवी मुंबई ः क्रेडाई-बीएएनएम यांच्या संयुक्त विद्यमाने २१ वे मेगा प्रॉपर्टी प्रदर्शन येत्या ७ ते १० एप्रिल २०२३ या कालावधीत वाशीतील सिडको एविझबिशन सेंटर येथे आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनात नवी मुंबईतील शेकडो नामांकित बांधकाम व्यावसायिक सहभागी होणार आहेत. सुप्रसिध्द अभिनेत्री मलायका अरोरा या प्रदर्शनातील मुख्य आकर्षण आहे. सामान्य नागरिकाला परवडणाऱ्या घरापासून अत्याधुनिक लक्झरी पलॅट सदर प्रदर्शनात उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती ‘क्रेडाई-बीएएनएम'चे अध्यक्ष वसंत भद्रा यांनी पत्रकार परिषद मध्ये दिली.

याप्रसंगी ‘क्रेडाई-बीएएनएम'चे माजी अध्यक्ष देवांग त्रिवेदी, भुपेंद्र शहा, खजिनदार करण सबलोक, धर्मेंद्र कारिया, सुरेंद्रभाई ठक्कर, हरिश छेडा, सचिन अग्रवाल, मनिष भतिजा, रसिक चौहान, प्रकाश बाविस्कर, जिगर त्रिवेदी, मनिष शाह यांच्यासह इतर नामांकित बांधकाम व्यावसायिक उपस्थित होते. या प्रॉपर्टी प्रदर्शनाचे डेल्टा ग्रुप मुख्य संयोजक तर पॅराडाईज ग्रुप आणि डीडीएसआर ग्रुप मुख्य प्रायोजक तर सह-प्रायोजक सुरींदर सबलोक यांचे कामधेनू रिॲलिटीज, अरिहंत सुपरस्ट्रक्चर्स लि. आणि टेस्कॉन ग्रीन असे नामांकित ग्रुप आहेत.

नवी मुंबईतील बांधकाम व्यावसायिक यांची नवी मुंबई बिल्डर्स असोसिएशन आणि कॉन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया (क्रेडाई) अर्थात क्रेडाई-बीएएनएम यांच्या संयुक्त विद्यमाने २० वर्ष प्रॉपटी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत आहे. कोव्हीड संसर्गामुळे मागील दोन वर्षे प्रॉपटी प्रदर्शन आयोजित करण्यात आले नाही. त्यानंतर यंदा ७ ते १० एप्रिल दरम्यान सिडको एक्झिबिशन सेंटर येथे २१ वे प्रॉपर्टी प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

नवी मुंबई, खारघर, पनवेल, उलवे, खोपोली, कर्जत, तळोजा, पुष्पकनगर, पामबीच, द्रोणागिरी, उरणसह ‘सिडको'च्या नैना प्रकल्पात उभे असलेल्या आणि सुरु असलेले तसेच भविष्यात निर्माण होणाऱ्या आपल्या प्रकल्पातील २० लाखापासून ते १५ कोटी रुपयांपर्यंतची घरे प्रदर्शनामध्ये विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. सदर प्रॉपटी प्रदर्शनाला मागील वर्षी मोठा प्रतिसाद लाभला होता. आता याही वर्षी उत्स्फुर्त प्रतिसाद लाभत असून सुमारे १५० बांधकाम व्यावसायिकांनी प्रदर्शनात सहभाग नोंदवला आहे, असेही वसंत भद्रा यांनी सांगितले.

दरम्यान, या प्रॉपर्टी प्रदर्शनाच्या उद्‌घाटनासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर मान्यवरांना निमंत्रित करण्यात आल्याचे भद्रा म्हणाले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘डी. वाय. पाटील विद्यापीठ'चा दीक्षांत सोहळा संपन्न