केवळ १०० रुपयांत १ किलो रवा, १ किलो साखर, १ किलो डाळ, १किलो तेल वाटप ; आनंदाचा शिधा

 आ.मंदाताई म्हात्रे यांच्या हस्ते ‘आनंदाचा शिधा'चे वाटप

नवी मुंबई ः गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यातील शिधापत्रिका धारकांना फक्त १०० रुपयांत आनंदाचा शिधा देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. याच अनुषंगाने बेलापूर गांव येथील शिधावाटप
दुकान नं.१ येथे आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या शुभहस्ते रेशनकार्ड धारकांना केवळ १०० रुपयांत ‘आनंदाचा शिधा'चे (१ किलो रवा, १ किलो साखर, १ किलो डाळ, १किलो तेल) वाटप करण्यात आले. याप्रसंगी ‘बेलापूर सहकारी
संस्था'चे अध्यक्ष रवींद्र म्हात्रे, माजी नगरसेवक दिनानाथ पाटील, ज्योती पाटील, बाळकृष्ण बंदरे, प्रमोद जोशी, शैला म्हात्रे, मोहन मुकादम, विज्ञान म्हात्रे, कल्पेश कुंभार, निलेश पाटील, अनिल पाटील, भालचंद्र
म्हात्रे, शिधावाटप अधिकारी छाया पालवे, सहाय्यक शिधावाटप अधिकारी बाळकृष्ण उदुगडे, बेलापूर निरीक्षक शीतल लाडके तसेच लाभार्थी आणि महिला उपस्थित होते. यावेळी बेलापूर गावातील ११२३ लाभार्थ्यांनी ‘आनंदाचा
शिधा'चा लाभ घ्ोतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून दारिर्द्य रेषेखालील  गरीबांतील गरीब असेल त्यांना धान्य मिळालं पाहिजे, या हेतुने ‘आनंदाचा शिधा'चे वितरण करण्यात येत आहे. सध्या रामनवमी उत्सवाची धामधुम सुरु आहे. यामुळे आनंदाचा शिधा वाटपामुळे सर्वत्र आनंद व्यक्त केला जात आहे.

राज्य शासनातर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस साहेब यांच्या माध्यमातून पूर्ण राज्यभर ‘आनंदाचा शिधा'चे वाटप होत आहे. त्याअनुषंगाने बेलापूर मतदारसंघातून सुरुवात केलेली आहे. त्यामुळे लाभार्थी वुÀटुंबाच्या घरामध्ये खऱ्या अर्थाने पाडवा साजरा होत आहे, असे आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पोलीस अधिकाऱ्यांसाठी वाशीत कार्यशाळेचे आयोजन