सदर ठिकाणी आगामी प्रकल्पांमुळे पर्यावरणाचा नक्कीच ऱ्हास हाेण्याची भीती व्यवत

खारफुटी, पाणथळ क्षेत्रावर नवी मुंबई सेझ आयटी हब निर्मिती

नवी मुंबई ः नवी मुंबई सेझवर अल्ट्रा मॉडर्न आयटी हब प्रकल्प हानीकारक असल्याची बाब पर्यावरणवाद्यांनी व्यवत केली आहे. यामुळे पाणथळ क्षेत्रे आणि हजारो खारफुटींवर भराव घातला जाईल. यासंदर्भात ‘नॅटकनेवट फाऊंडेशन'ने केलेल्या तक्रारीची दखल घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पर्यावरण आणि वन विभागाच्या सचिवांना या प्रकरणाची तपासणी करुन पुढील कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

राज्य शासनाने नुकतीच नवी मुंबई सेझला एकात्मिक औद्योगिक प्राधिकरणात बदलण्यास परवानगी दिली होती. त्यानुसार येथील भूखंडाचा ८५ टवके व्यावसायिक आणि १५ टवके रहिवासी उद्देशासाठी वापर केला जाणार आहे. ‘नॅटकनेवट फाऊंडेशन'ने केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाला (एमओइएफसीसी) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ‘सिडको'ने मोठ्या प्रमाणात खारफुटी प्रभाग आणि पाणथळ क्षेत्राचे नवीमुंबई सेझला वितरण करण्याबद्दल तक्रार केली होती. याहून जास्त गंभीर बाब म्हणजे नवी मुंबई सेझने एका मोठ्या खाजगी कंपनीसोबत एमओयूवर स्वाक्षरी केल्यानंतर विकासाच्या नावाखाली खारफुटी आणि पाणथळ क्षेत्रांचा मोठ्या प्रमाणावर अमर्याद ऱ्हास सुरु झाला आहे.

उच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या उच्च-अधिकार समित्यांनी खारफुटी आणि पाणथळ क्षेत्रांचे पुनर्वसन करण्याचे दिलेले आदेश देखील अंमलबजावणी न झाल्यामुळे फोल ठरले आहेत, असे ‘नॅटकनेवट फाऊंडेशन'चे संचालक बी. एन. कुमार यांनी सांगितले. त्यामुळे सदर ठिकाणी आगामी प्रकल्पांमुळे पर्यावरणाचा नक्कीच ऱ्हास होईल, अशी भिती कुमार यांनी व्यवत केली आहे.

खारफुटी आणि पाणथळ जागांवर अमानुष पध्दतीने घातला जाणारा भराव आधीच गावांमध्ये आणि भातशेतीमध्ये पूर येण्यास कारणीभूत ठरला आहे, असे ‘सागरशवती'चे संचालक नंदकुमार पवार यांनी सांगितले. बांधकामामुळे आंतरभरतीच्या मुक्त प्रवाहात अडथळा निर्माण झाला आहे. त्याचप्रमाणे द्रोणागिरी नोडच्या निर्मितीसाठी जमिनीवर मोठ्या प्रमाणात भराव करण्यात आल्यामुळे सदर परिस्थिती निर्माण झाली असल्याची बाब पवार यांनी निदर्शनास आणून दिली. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

राम जन्मोत्सवासाठी सजले बेलापूर